सॅमसंगचे नवे स्मार्टफोन : गॅलक्सी A8 आणि A8 Plus

सॅमसंगने त्यांच्या गॅलॅक्सी A मालिकेत Samsung Galaxy A8 व Galaxy A8+ हे दोन नवे फोन सादर केले असून या फोन्समध्ये इन्फीनिटी डिस्प्ले, दोन फ्रंट कॅमेरा अशा खास सुविधा देण्यात आल्या आहेत.

२०१८ साठी असलेले हे फोन जानेवारी महिन्यात उपलब्ध होतील! माध्यम किंमतीच्या फोन्समध्ये मोठ्या डिस्प्लेचे फोन बनवण्यात आता सॅमसंगने सुद्धा उडी घेतली आहे. पेमेंटसाठी NFC, MST ची जोड, ड्युअल फ्रंट कॅमेरा जी सॅमसंग फोन्ससाठी नवी गोष्ट असेल आणि नवा १८:९ रेशो असलेला डिस्प्ले हि यांची वैशिष्ट्ये ठरतील. चिनी फोन्सने बरंच मार्केट काबीज केलेलं असलं तरीही त्या फोनना नकार देत महाग असले तरीही गुणवत्तेला प्राधान्य देत सॅमसंग, नोकियाचा पर्याय ग्राहक पुन्हा निवडू लागले आहेत!   

डिस्प्ले : A8 : 5.6-inchFHD+ Super AMOLED,1080×2220
           A8+ : 6.0-inch FHD+ SuperAMOLED,1080×2220
कॅमेरा Front: Dual Camera 16MP FF (F1.9) + 8MP (F1.9)
          Rear: 16MP PDAF (F1.7)
वजन  A8 : 172g,  A8+ : 191g
प्रोसेसर : Octa Core (2.2GHz Dual + 1.6GHz Hexa)
मेमरी :  A8 : 4GB RAM, 32/64GB,  A8+ : 4/6GB RAM, 32/64GB
बॅटरी : A8 : 3,000mAh A8+ : 3,500mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 7.1.1
इतर NFC, MST, Fast Charging / USB Type-C, Bluetooth® v 5.0
सेन्सर : Accelerometer, Barometer, Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic Sensor, Hall Sensor, Proximity Sensor, RGB Light Sensor
किंमत : रु  ३२,९९०  (२० जानेवारीपासून अॅमेझॉनवर उपलब्ध http://amzn.to/2Dnl4tF)

Exit mobile version