गूगलला ३५००० कोटी दंड : अँड्रॉइडबाबतीत अॅंटीट्रस्ट नियमांचे उल्लंघन!

गूगलला युरोपियन नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल आजवरचा सर्वात मोठा दंड केला गेला असून अँटीट्रस्ट कायद्याचं उल्लंघन गूगलला तब्बल  €4.3 billion म्हणजे जवळपास ३४२०० कोटी रुपये दंड करण्यात आलेला आहे. अलीकडेच GDPR मुळे युरोपात नियम कडक करण्यात आले होते. युरोपियन आयोगाच्या म्हणण्यानुसार गुगलने त्यांच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिममुळे असलेल्या दबदब्याचा तीन गोष्टींसाठी गैरवापर केला आहे. गूगल त्यांच्या अँड्रॉइडसोबत त्यांचे स्वतःचे अॅप्स जोडत आहे, गूगलवर अँड्रॉइडवर आधारित फोन बनवणाऱ्या कंपन्याना त्यांचं स्वतःचं अँड्रॉइड व्हर्जन बनवून फोनमध्ये जोडण्यास प्रतिबंध केला आहे आणि काही मोठ्या फोन निर्मात्या कंपन्यांना व टेलिकॉम ऑपरेटर्सना पैसे देऊन त्यांचं गूगल सर्च अॅप फोन्सवर केलेलं आहे!

अँटीट्रस्ट कायदा (एकाधिकारशाही विरोधात कायदा) : कोणत्याही कंपनीने त्यांच्या बाजारात असलेल्या प्रभुत्वामुळे इतर स्पर्धकांना बाजूला करून स्पर्धा नष्ट करू नये जर त्या कंपनीने तसं केलं तर मोठी दंडात्मक कारवाई होईल.   

युरोपियन आयोगाने त्यांना ९० दिवसात या सर्व बेकायदा गोष्टी थांबवा असा आदेश दिला आहे. ज्याचा अर्थ असा की गूगलला मॅन्युफॅक्चरर/फोन निर्मात्यांना क्रोम आणि गूगल सर्च अॅप आधीपासून इन्स्टॉल करून देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

गूगल सध्या तिथे दंडाची रक्कम 5 Billion डॉलर्स १६ दिवसात कमावते त्यामुळे या दंडाने फार फरक पडला नसला तरी गूगलला नक्कीच त्यांच्या सिस्टिममध्ये बदल करावे लागतील! तरीही गूगलने या निर्णयाविरोधात युरोपियन संघाकडे दाद मागण्याच ठरवलं आहे. यापूर्वीचे घडलेले प्रकार पाहता गूगलची सुटका होण्याची शक्यता कमीच आहे. यापूर्वी तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या कंपन्यांना बऱ्याच वेळा अशा अँटीट्रस्ट कायद्याच्या समोर झुकावं लागलं आहे.
  
search terms : Google fined a record $5 billion by the EU for Android antitrust violations Antitrust information in Marathi
1EU=80INR, 1USD=70INR

Exit mobile version