Honor 9N भारतात सादर!

Honor तर्फे आज Honor 9N हा स्मार्टफोन सादर करण्यात आला असून तो 31 जुलै पासून फ्लिपकार्ट वर उपलब्ध होईल. या फोन सोबत फेस अनलॉक, ड्युअल कॅमेरा, 19:9 अस्पेक्ट रेशो डिस्प्ले, राईड मोड, पार्टी मोड ज्याद्वारे एकावेळी 7 डिवाइस सिंक करता येतील (OTA अपडेट द्वारे उपलब्ध) यांसारख्या सोयी असतील.

हा फोन ड्युअल सिम असून दुसरे सिम स्लॉट हायब्रिड पद्धतीचे आहे. त्याचबरोबर चार रंगात उपलब्ध असेल. तसेच ह्या फोनची निर्मिती मेक इन इंडिया अंतर्गत केलेली असेल. हॉनर कंपनी हुवावे या कंपनीचा भाग आहे. 

Honor 9N Specifications:
डिस्प्ले : 5.84″ 2280*1080 FHD+ Full View Display with Notch
प्रोसेसर : Kirin 659 Octa Core 2.36 GHz 
रॅम : 3/4 GB
स्टोरेज : 32/64/128GB (Expandable Upto 256 GB)
बॅटरी : 3000mAh Battery (Lithium Polymer)
ऑपरेटिंग सिस्टिम : EMUI 8.0 ( Android Oreo 8 आधारीत)
कॅमेरा : 13 MP +  2MP Rear Camera
फ्रंट कॅमेरा : 16 MP
रंग : Sapphire Blue, Lavender Purple, Robin Egg Blue and Midnight Black
सेन्सर : Fingerprint Sensor, Proximity Sensor, Ambient Light Sensor, Compass, Gravity Sensor
इतर : 2.5D Curved Glass, USB 2.0, Fingerprint reader, Nano- Optical Film, Ride Mode.

Honor 9N हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. Honor 9N YouTube Video

पुढीलप्रमाणे तीन प्रकारात उपलब्ध असेल आणि सोबत त्यांच्या किंमती
₹ ११९९९ (3+32GB)
₹ १३९९९ (4+64GB)
₹ १७९९९ (4+128GB)

search terms huawei honor 9N launched in India

Exit mobile version