OnePlus 3/3T साठी अँड्रॉइड 8.1 सोडून थेट अधिकृत अँड्रॉइड P अपडेट मिळणार!

अँड्रॉइडच्या चाहत्यांमध्ये नेहमी पुढे असणारं नाव म्हणजे वनप्लस कंपनीतर्फे मिळणार सॉफ्टवेअर सपोर्ट नक्कीच चांगला आहे. गेले काही महिने मात्र वनप्लसने 3 व 3T या मॉडेल्सच्या अपडेटवर फार लक्ष दिलं नव्हतं. अँड्रॉइड 8.0 ओरीओ अपडेट मध्ये सुद्धा समस्या असल्याने चक्क कंपनीला अपडेट मागे घ्यावं लागलं होतं!
त्यानंतर त्यांनी किमान अँड्रॉइड 8.1 अपडेट देण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं मात्र आज त्यांच्या फोरमवर केलेल्या पोस्टनुसार अँड्रॉइड 8.1 गाळून थेट पुढील अँड्रॉइड P 9.0 अपडेट दिलं जाईल असं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे! हे फोन जून २०१६ आणि नोव्हेंबर २०१६ मध्ये सादर झाले होते! त्या वेळी भारतातल्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या फोन्समध्ये यांनी स्थान मिळवलं होतं!

अधिकृत माहिती : Android P is coming to the OnePlus 3 and 3T

अँड्रॉइड फोन्सना काही महिन्यानंतर लगेच अपडेट मिळणं जवळपास पूर्ण बंद होतं. आयफोनच्या तुलनेत ह्या एका बाबतीत अँड्रॉइड फोन्स नक्कीच मागे आहेत असं म्हणावं लागेल. आता सादर होणारे फोन्स  कमी करून सॉफ्टवेअर सपोर्ट वर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे हे कंपन्यांना लवकर समजावं. सोनीने त्यांच्या सर्व फोन्सना AOSP सॉफ्टवेअर पुरवलं असल्यामुळे जरी अधिकृत अपडेट बंद झाले तरी डेव्हलपर चांगलं सॉफ्टवेअर स्वतः बनवू शकतात . किमान असाच सपोर्ट जर प्रत्येक फोन निर्मात्याने दिला तरी चांगली गोष्ट आहे!
   
काही दिवसांपूर्वीच वनप्लसने ओरीओ आधारित सॉफ्टवेअर अपडेट 5.0.4 द्वारे फ्रंट कॅमेरा सुधारणे अँड्रॉइड जुलै सिक्युरिटी पॅच, ISO सेटिंज दुरुस्त केल्या होत्या. वनप्लसने आता त्यांच्या 3, 3T, 5, 5T आणि नवा 6 या सर्व फोन्सना अँड्रॉइड P अपडेट मिळेल असं जाहीर केलं आहे! दरम्यान वनप्लस 6 ला आलेल्या अपडेट मुळे काही जणांना स्क्रीन फ्लिकर होताना दिसत असल्याच निदर्शनास आलं आहे. लवकरच गूगलकडून या अँड्रॉइड P व्हर्जनच अधिकृत नाव जाहीर केलं जाईल!

search terms oneplus 3 3t to get Android P 9.0 update confirmed officially   

Exit mobile version