स्मार्टफोन विक्रीमध्ये अॅपलला मागे टाकत हुवावे दुसर्‍या क्रमांकावर, सॅमसंग अजूनही प्रथमच स्थानी!

हुवावे (Huawei) या चिनी कंपनीने अॅपलला मागे टाकून सॅमसंग नंतर दुसऱ्या तिमाहीत सर्वात जास्त स्मार्टफोन विक्री करणारी दुसरी कंपनी ठरली आहे. Counterpoint च्या रिसर्चनुसार मागील वर्षाच्या तुलनेत सॅमसंगची स्मार्टफोन विक्री २ टक्क्यांनी घसरून जागतिक विक्रीच्या २० टक्क्यांवर आली असली तरी हुवावेच्या तुलनेत सॅमसंग अजूनही पुढेच आहे. अॅपल जरी तिसऱ्या स्थानावर फेकली गेली असली तरी विक्री मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. सॅमसंगने ७.१६ कोटी फोन्सची विक्री केली आहे तर त्यापाठोपाठ हुवावेने ५.४२ तर अॅपलने ४.१३ कोटी फोन्सची दुसऱ्या तिमाहीत विक्री केली आहे.लेनोवो, जिओनी, मायक्रोमॅक्स आणि सोनी यांनी दुसऱ्या तिमाहीत सर्वात जास्त घट नोंदविली

अॅपल पाठोपाठ शायोमी, ओप्पो, विवो या कंपन्यांनी क्रमांक पटकावला आहे. तर नोकिया ब्रँड अंतर्गत फोनची विक्री करणाऱ्या HMD Global ने जागतिक स्मार्टफोन  विक्रीच्या १ टक्के फोन्सची विक्री दुसऱ्या तिमाहीत करून प्रथम १० मध्ये स्थान पटकावले. तसेच लेनोवोला (मोटोरोला मिळून) जागतिक शिपमेंट्सच्या ३ टक्के विक्री दुसऱ्या तिमाहीत करता आली.

हुवावे, ओप्पो, विवो सारख्या मोठ्या चिनी स्मार्टफोन कंपन्या AI, ड्युअल कॅमेरा, बेझल लेस डिस्प्ले यांसारख्या  सुविधा देऊन त्यांच्या फोन्स ची ASP(Avergae Selling Price) वाढवण्यावर भर देत आहेत.

अॅपलच्या शेअर्सची जगातल्या पहिल्या 1 Trillion डॉलर्स कंपनी बनण्याच्या दिशेने वाटचाल : शेअर्स बाबत बाजारातील सर्व अंदाज पार करत अॅपलच्या शेअर्सनी ५% वाढ नोंदवून नवा उच्चांक गाठला आहे. आता अॅपलचं बाजार भांडवल तब्बल १ लाख कोटींजवळ पोहोचलं आहे. काही महिन्यातच ते हा टप्पा पार करतील! $1000 डॉलर्स किंमत असलेला आयफोन टेन या वाढीसाठी प्रमुख कारण ठरला आहे! एकूण मॉडेल्स कमी विकले गेले तरी किंमत जास्त असल्यामुळे नफा वाढताना दिसत आहे! तरीही आयफोनची ही वाढणारी किंमत काही जणांच्या नाराजीचं कारण ठरली होती.

दरम्यान पहिल्या तिमाही प्रमाणेच एकूण स्मार्टफोन विक्री २% नी घटली आहे. तसेच ७९% मार्केट शेअरवर फक्त १० कंपन्यांची मक्तेदारी असून जवळपास ६००+ कंपन्या उर्वरित २१% मार्केट साठी स्पर्धा करत आहेत. तसेच जगासोबतच चीनमध्ये सुद्धा स्मार्टफोन विक्री कमी होत असताना हुवावे चीनमध्ये प्रथम आहे.

search terms huawei surpasses apple global smartphone sales samsung xiaomi oppo vivo nokia iphone 

Exit mobile version