केरळ पूरग्रस्तांना ऑनलाइन मदत!

केरळमध्ये आलेल्या भयंकर महापूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून लाखो लोक बेघर झाले आहेत. लाखो लोकांना छावण्यामध्ये हलविण्यात आले असले तरी मोठ्या प्रमाणावर गरजेच्या वस्तूंचा तुडवडा भासत आहे. यामुळेच अनेक स्तरातून आपापल्या परीने मदतीचा हात पुढे केला जात आहे. दिवसरात्र सर्व स्तरातून मदतकार्य चालू असून आपल्या परीने जेवढी शक्य होईल ती मदत आपण खालीलप्रकारे करू शकता.

पेटीएम अॅपचा वापर करून :-

पेटीएम अॅपच्या माध्यमातून आपण मदत करू शकता, यासाठी Paytm अॅप उघडल्यानंतर वरीलप्रमाणे Kerala Floods वर क्लिक करा (ऑप्शन नसल्यास View All वर क्लिक करा) व Kerala CM’s Distress Relief Fund मध्ये शक्य तेवढी अमाऊंट टाकून Proceed वर क्लिक करून Paytm बॅलन्स, डेबिट/क्रेडिट कार्ड, भीम UPI द्वारे पेमेंट करा. पेटीएम डायरेक्ट लिंक

भीम UPI किंवा तेझ अॅपद्वारे :-

UPI च्या माध्यमातून सहजपणे मदत करता येईल. यासाठी keralacmdrf@sbi या UPI ID / VPA वर आपण मदत पाठवू शकता किंवा तेझ अॅपमध्ये Kerala CM’s Distress Relief Fund वर क्लिक करून मदत करता येईल. Businesses मध्ये नवा पर्याय आपोआप आलेला दिसेल त्यावर जाऊन पैसे पाठवू शकता.

बँक डिटेल्सच्या मदतीने :-
जर आपणास इंटरनेट बँकिंग सारख्या माध्यमातून मदत करायची असल्यास आपण खालील डिटेल्स वर ती पाठवू शकता.
Chief Minister’s Distress Relief Fund
Account NO: 67319948232
Bank: State Bank of India
Branch: City branch, Thiruvananthapuram
IFSC : SBIN0070028
SWIFT CODE : SBININBBT08
इन्कमटॅक्स सेक्शन 80(G) नुसार CMDRF साठीची रक्कम टॅक्समुक्त असेल.

केरळ गव्हर्नमेंट च्या पुढील डोनेशन पोर्टल वरून सुद्धा मदत करता येईल https://donation.cmdrf.kerala.gov.in/
तसेच अॅमेझॉनवरून गरजेच्या वस्तू Habitat for Humanity, World Vision India, Goonj या NGO द्वारे पाठवू शकता.

दरम्यान गूगलने सुद्धा Person Finder टूल उपलब्ध करून दिलं आहे ज्यामुळे कोणी व्यक्ती हरवली असेल किंवा सापडली असेल तर इथे कळवता येईल.  फेसबुकवर Safety Check ची सोय आहेच

Exit mobile version