नोकिया 6.1 प्लस सादर : मध्यम किंमतीत उत्तम सोयी!

नोकिया 6.1 प्लस आणि 5.1 प्लस आज भारतात सादर करण्यात आले असून  नॉच असणारा नोकियाचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. उत्तम बिल्ड क्वालिटी, स्टॉक अँड्रॉइड बरोबरच वेळोवेळी Security आणि OS अपडेट साठी नोकिया स्मार्टफोन प्रसिद्ध आहेत. नोकियाचे स्मार्टफोन हे अँड्रॉइड वन अंतर्गत येतात त्यामुळे गूगल कडून देण्यात येणारा पूर्ण अँड्रॉइड अनुभव तसेच लवकर अँड्रॉइड अपडेट मिळतात. या दोन्ही फोन्समध्ये 19:9 डिस्प्ले, Artificial Intelligence (AI) एन्हान्समेंट, HDR फोटोग्राफी, बोके इफेक्ट, बोथी मोड सारख्या फिचर चा समावेश आहे.

नोकिया 6.1 प्लस हा फ्लिपकार्ट सोबतच Nokia.com वर ३० ऑगस्ट पासून उपलब्ध असेल. तसेच प्री ऑर्डर दोन्ही ठिकाणी आजपासून चालू होतील. तर नोकिया 5.1 प्लस सप्टेंबर मध्ये उपलब्ध होणार असून याची भारतातील किंमत तेव्हाच जाहीर केली जाईल परंतु ती €199 च्या आसपास असेल.

Nokia 6.1 Plus Specifications 
डिस्प्ले : 5.8 inch (2280х1080) FHD+ 19:9 Display with Notch
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 636
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB (Expandable Upto 400GB)
बॅटरी : 3060 mAh Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.1
कॅमेरा : 16 MP + 5MP Dual Tone Flash
फ्रंट कॅमेरा : 16 MP (f/2.0)
रंग : Gloss Midnight Blue, Gloss White, Gloss Black
सेन्सर : Fingerprint Reader (On the Back), Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, E-compass, Gyroscope
इतर : USB Type-C, Dual Sim Slot (Hybrid ), GPS/AGPS+GLONASS, 3.5mm Audio Jack, Bluetooth 5.0, Gorilla Glass 3
किंमत – ₹१५,९९९

Nokia 6.1 Plus India Video – https://youtu.be/7ebCTSg1M-w

Nokia 6.1 Plus on –  फ्लिपकार्ट / Nokia.com

Nokia 5.1 Plus Specifications
डिस्प्ले : 5.8 inch (1920х1080) HD+ 19:9 Display with Notch
प्रोसेसर : Media Tek Helio P60 (4 x A73 1.8GHz + 4 x A53 1.8GHz)
रॅम : 3GB
स्टोरेज : 32GB(Expandable Upto 400GB)
बॅटरी : 3060 mAh Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.1
कॅमेरा : 13 MP + 5MP LED Flash
फ्रंट कॅमेरा : 8 MP
रंग : Gloss Midnight Blue, Gloss White, Gloss Black
सेन्सर : Fingerprint Reader, Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, Gyroscope
इतर : USB Type-C, Dual Sim Slot (Hybrid ), GPS/AGPS/GLONASS/BDS/Galileo, 3.5mm Audio Jack, Bluetooth 5.0, Material 2.5D Glass, Bluetooth 4.2
किंमत – सप्टेंबर मध्ये जाहीर केली जाईल

Nokia 5.1 India Video – https://youtu.be/4aGsy5ooJ6s

सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या शायोमीचा MI A2 , Honor 9N, Samsung Galaxy On 8 अशा मध्यम किंमतीच्या फोन्सना एक चांगला पर्याय नोकिया 6.1 प्लस च्या रूपात  उपलब्ध झाला आहे. काही दिवसांपूर्वीच नोकिया ब्रँड अंतर्गत फोनची विक्री करणाऱ्या HMD Global ने जागतिक स्मार्टफोन विक्रीत  प्रथम १० कंपन्यांमध्ये स्थान पटकावले होते.

Exit mobile version