सॅमसंग गॅलक्सी नोट ९ सादर : सोबत गॅलक्सी होम स्पीकर, गॅलक्सी स्मार्टवॉच!

सॅमसंगने त्यांच्या लोकप्रिय नोट मालिकेमधील नवा स्मार्टफोन Note 9 सादर केला आहे! आयफोन, वनप्लस आणि स्वतः सॅमसंगच्या एस ९ आणि एस ९ प्लससारख्या प्रीमियम फोन्सच्या स्पर्धेत या फोनचा प्रवेश नक्कीच खास आहे. सॅमसंगने आयफोनच्या डिस्प्लेवरील नॉचवरून काही जाहिराती करून अॅपलची चेष्टा केली होती. त्यासमोर नोट ९ च्या डिस्प्लेबद्दल उत्सुकता होती. आणि शेवटी आज हा फोन Samsung Unpacked नावाच्या कार्यक्रमात सादर करण्यात आला आहे. सोबत गॅलक्सी होम आणि गॅलक्सी स्मार्टवॉचसुद्धा सादर झाले आहेत!

यूट्यूबने सिग्नेचर डिव्हाईस म्हणून सर्टीफाय केलं आहे. सोबत फोर्टनाईट या प्रसिद्ध गेमची चाचणी आवृत्ती अँड्रॉइड फोन्सवर सर्वात आधी नोट ९ वर प्रथम उपलब्ध होत आहे त्यानंतर सॅमसंगच्या गॅलक्सी फोन्सवर Beta व्हर्जन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासोबत स्पॉटीफाय या संगीत सेवेसहसुद्धा भागीदारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वॉटर कार्बन कुलींग असून यामुळे फोनचं तापमान कमी राहील!

एस पेन : नोट मालिकेचे नवे वैशिष्ट्य आता याद्वारे यूट्यूब, पॉवरपॉईंटसारखे अॅप्स नियंत्रित करता येतील!
याबद्दल डेमो देताना मोठ्या स्क्रिनवरील प्रेझेंटेशनसुद्धा एस पेनद्वारेच नियंत्रित केलं जात होतं! याला आता चार्ज करावं लागणार असून पाच मिनिटे फोनमध्ये ठेवताच अर्धा तास वापरता येईल! ब्ल्यूटूथ द्वारे यामधील रिमोट अॅक्सेस कार्य घडेल!

डेक्स प्लॅटफॉर्म : याद्वारे नोट ९ टीव्ही, प्रोजेक्टरला जोडून फोन आता एका डोंगलद्वारे सहज वापरता येईल! (Type C to HDMI)
डोंगलला आता थेट कोणत्याही HDMI आधारित स्क्रिन/डिस्प्ले जोडून फोन कॉम्पुटरप्रमाणे काम करतो. प्रेझेंटेशन, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट एडिट करण्यासाठी चांगला उपयोग होतो!   

व्हिडिओ : Samsung Galaxy Note9: Official Introduction

Samsung Galaxy Note 9 सुविधा :
डिस्प्ले : 6.4″ 2960×1440 pixels, 18.5:9 ratio, 516 ppi, Corning Gorilla Glass 5
प्रोसेसर : Snapdragon 845 Octa Core
ड्युयल कॅमेरा : 12 MP, f/1.5-2.4, 26mm, 1/2.55″, 1.4µm, dual pixel PDAF, OIS
12 MP, f/2.4, 52mm, 1/3.6″, 1µm, AF, OIS, 2x optical zoom
फ्रंट कॅमेरा : 8 MP, f/1.7, 25mm, 1/3.6″, 1.22µm, AF
रॅम : 6GB/8GB
मेमरी : 128GB/512GB
बॅटरी : 4000mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉइड ओरीओ ८.१
सेन्सर्स : Iris, fingerprint, accelerometer, gyro, proximity, compass, barometer, heart rate, SpO2
इतर : USB 3.1, Type-C, Bluetooth 5.0, IP68
किंमत : $1000 (6GB) | $1300 (8GB)
भारतीय किंमत : ₹६७,९०० । ₹८४,९००

Samsung Galaxy Home

गॅलक्सी होम : हा बिक्स्बी व्हॉइस असिस्टंट आधारित स्मार्ट स्पीकर असून तो काही कालावधीनंतर उपलब्ध होणार आहे! यामध्ये आठ मायक्रोफोन्स, आठ स्पीकर्स, साऊंड स्टिअर पॉईंटेड ऑडिओ व Bixby Assistant चा समावेश आहे

Samsung Galaxy Watch

गॅलक्सी स्मार्टवॉच : सॅमसंगने त्यांच्या वियर स्मार्टवॉचला आता नवं रूप देऊन गॅलक्सी वॉच नावाने सादर केलं आहे! 1.3” डिस्प्ले, 472mAh बॅटरी, Tizen Wearable OS 4.0 ऑपरेटिंग सिस्टिम, 1.5GB RAM + 4GB Internal Memory!  Onyx Black, Deep Ocean Blue, Basalt Grey रंगात उपलब्ध!   

search terms : samsung galaxy note 9 launched unpacked galaxy watch bixby smart speaker 

Exit mobile version