अॅमेझॉन पे ईएमआय (Amazon Pay EMI) सुविधा सादर

अॅमेझॉनकडून ग्राहकांसाठी आता अॅमेझॉन पे ईएमआय (Amazon Pay EMI) सादर करण्यात आला आहे. याअंतर्गत ग्राहकांना शॉपिंग करण्यासाठी ६०,००० रुपयांपर्यंत तात्काळ क्रेडिट दिले जाईल व ईएमआयच्या रूपात आपण निवडलेल्या महिन्यांत ते व्याजासहित आपल्या बँक अकाउंटमधून आपोआपच कापले जाईल. यासाठी अॅमेझॉनने कॅपिटल फ्लोट या वित्त संस्थेशी करार केला आहे. डेबिट कार्डचा पर्याय वापरून ईएमआयच्या रुपात ग्राहकांना आता खरेदी करता येणार आहे. परंतु सध्यातरी ठराविक बँकांच्या डेबिट कार्डसाठीच ही सेवा उपलब्ध आहे. यामध्ये HDFC, ICICI, कॅनरा, सिटी बँक, कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे. येणार्‍या दिवसांत यामध्ये आणखी बँका जोडल्या जातील.

अॅमेझॉन पे ईएमआयसाठी आपणास पॅन कार्ड नंबर तसेच आधार नंबर द्यावा लागेल व त्यानंतर आपणास रजिस्टर केले जाईल. जर आधार नंबर द्यायचा नसेल तर त्याऐवजी VID सुद्धा देऊ शकता. यानंतर आपणास ठराविक क्रेडिट लिमिट उपलब्ध करून दिले जाईल. वरील सर्व प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल आहे. यानंतर ऑटोमॅटिक पेमेंटसाठी आपणास आपले डेबिट कार्ड जोडावे लागेल. यादरम्यान अॅमेझॉन तर्फे आपल्या अकाउंट वरून पाच रुपयांपर्यंत अमाऊंट कट केली जाईल व काही दिवसांत पुन्हा अकाऊंटवर जमा केली जाईल.

सद्य स्तिथीत अॅमेझॉन पे ईएमआय फक्त मोबाइल अॅप वर उपलब्ध असून अजूनही अॅमेझॉनच्या सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध नाही. आपण अॅप उघडल्यानंतर अॅमेझॉन पे ईएमआय बद्दल पोष्टर पाहून त्यावर क्लिक करून प्रोसेस करू शकता.खरेदी करता वेळेस पेमेंट पेजवर आपणास अॅमेझॉन पे ईएमआयचा पर्याय निवडावा लागेल. सध्या अॅमेझॉन पे ईएमआय वापरण्यासाठी कमीतकमी ८००० रुपयांची वस्तू घेणे बंधनकारक आहे तर एका वेळेस एकच वस्तू कार्ट मध्ये घेऊन ही सुविधा वापरता येईल. 

Exit mobile version