अॅमेझॉन प्राईम रिडींगद्वारे प्राइम ग्राहकांना मोफत पुस्तके उपलब्ध!

अॅमेझॉन प्राईम रिडींग सेवा आता भारतात उपलब्ध झाली असून या सेवेद्वारे अॅमेझॉन प्राईम ग्राहक उत्तम पुस्तके आणि कादंबऱ्या फुकटात वाचू शकतील! यासाठी अॅमेझॉन किंडल किंवा फोनवर उपलब्ध असलेलं किंडल अॅप असणं गरजेचं आहे जे अँड्रॉइड व iOS वर उपलब्ध आहे.

प्राईम रिडींग कसं वापरायचं ? : amazon.in वेबसाईटवर जा किंवा फोनवरील अॅमेझॉन अॅप उघडा वर बॅनर आलेला दिसेल Prime Reading लिहलेल असेल. (जर तुम्ही प्राईमचं सदस्यत्व घेतलं असेल तरच दिसेल) आता जी पुस्तके वाचायची आहेत ती दिलेल्या यादीतून निवडा आणि त्यानंतर तुमच्या किंडल मध्ये किंवा किंडल अॅपमध्ये ते पुस्तक मोफत वाचता येईल!

अॅमेझॉन प्राइम सेवेबद्दल माहिती :  Amazon Prime

प्राईम रिडींग भारतात अॅमेझॉन प्राइमच्या सदस्य असलेल्या ग्राहकांना मोफत आहे. साहित्य, कथा, कादंबरी, रहस्य, कॉमिक्स अशा विविध प्रकारच्या पुस्तकांची यादी अॅमेझॉनने उपलब्ध करून दिलेली आहे जी येणाऱ्या काळात आणखी मोठी होईल असं सांगण्यात आलं आहे. भारतीय भाषांमधील पुस्तकेसुद्धा यामध्ये उपलब्ध आहेत.

प्राईम व्हिडीओ, प्राईम म्युझिक नंतर आता प्राईम रिडींग सुद्धा त्यांच्या प्राईम सेवेतच मोफत उपलब्ध असेल!
अॅमेझॉन प्राइम सदस्यांना सध्यातरी एकाच सेवेद्वारे इतक्या सगळया सोयी मिळत आहेत ज्यामध्ये मोफत वस्तूंची डिलिव्हरी, दोन दिवसात डिलिव्हरी, प्राईम डेच्या दिवशी आणखी सूट अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.
ही सेवा दरमहा ₹१२९ किंवा ₹९९९ वार्षिक अशा स्वरूपात उपलब्ध आहे.

प्राईमचं सदस्यत्व घेण्यासाठी लिंक : Join Amazon Prime 

search terns amazon prime reading free books magazines comics marathi  

Exit mobile version