अमॅझॉन प्राइम म्युझिक सेवा आता भारतात उपलब्ध!

अमॅझॉन प्राईम ही अमॅझॉन या ऑनलाईन शॉपिंग खरेदी वेबसाईटची सेवा आहे ज्याद्वारे ग्राहकांना लवकर वस्तूंची डिलिव्हरी, खास सूट, प्राईम व्हिडीओ सेवेमधील चित्रपट पाहणे अशा सोयी मिळतात. आता त्यांची म्युझिक म्हणजे संगीत सेवा सुद्धा भारतात सादर झाली आहे. मात्र ही सेवा फक्त प्राईम ग्राहकांसाठीच आहे.
अमॅझॉन प्राईम सेवा आपण एका वर्षासाठी ९९९ रुपये भरून घेऊ शकतो.

या अमेझॉन प्राईम सेवेसाठी त्यांनी अँड्रॉइड व आयफोनसाठी अॅप्स सादर केली आहेत. या अॅप्समध्ये अलेक्सा या व्हॉइस असिस्टंटची सुद्धा जोड देण्यात आली आहे! आपण आपल्या आवडीची गाणी/गायक सांगायचं की अलेक्सा लगेच ते गाणे सुरु करेल!
Amazon Prime Music
यामध्ये १२ भाषांचा समावेश असून मराठी गाणी सुद्धा ऐकता येतात. स्मार्टफोन, फायर टीव्ही, कॉम्पुटर, अमॅझॉन अलेक्सा स्पीकर्स अशा सर्व डिव्हाईसवर आपण गाण्यांचा आनंद घेऊ शकतो! या सेवेमुळे अमॅझॉनची आता Gaana, Saavan, Wynk Music, Apple Music, Google Play Music, Hungama अशा आधीच असलेल्या सेवांसोबत स्पर्धा होईल!

search terms amazon prime music india free download marath music songs
अमॅझॉन प्राइम म्युझिक सेवा आता भारतात उपलब्ध! अमॅझॉन प्राइम म्युझिक सेवा आता भारतात उपलब्ध! Reviewed by Sooraj Bagal on February 28, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.