मोटोरोला वन पॉवर स्मार्टफोन सादर : 5000mAh बॅटरी!

आज मोटोरोला इंडियाकडून नवीन मोटोरोला वन सिरीज लाँच करण्यात आली असून यामध्ये मोटोरोला वन पॉवर स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. ही सिरीज अँड्रॉइड वन प्रोग्रॅमचा भाग असेल. मेटल डिझाईन,अधिक क्षमतेची बॅटरी (5000mAh), टर्बो चार्जर, डॉल्बी ऑडिओ, 19:9 अस्पेक्ट रेशो डिस्प्ले, पोर्ट्रेट मोड,4K रेकॉर्डिंग, मोटो ॲक्शन, मोटो डिस्प्ले यांसारखे फीचर्स यामध्ये असतील. शिवाय ड्युअल सिमसोबत 256GB पर्यंत मेमरी वाढविण्यासाठी अधिकचा स्लॉट उपलब्ध असेल.

मोटोरोला वन पॉवर चे पूर्णपणे भारतात प्रॉडक्शन केले जाणार आहे.सध्या मोटोरोला चे देशभरात ७०० मोटो हब आहेत ज्यामध्ये मोटोरोलाचे विविध फोन्स पाहता येतील तर ४५०+ शहरांत ३०००० काउंटर उपलब्ध होतील जेणेकरून ऑफलाईन मार्केट मधून फोन खरेदी सोपी व्हावी असे मोटोरोला तर्फे सांगण्यात आले आहे.

मोटोरोला वन पॉवर फ्लिपकार्ट exclusive असून ५ ऑक्टोंबर पासून उपलब्ध होईल.

Motorola One Power Specifications
डिस्प्ले : 6.2 inch (2246х1080) FHD+ 19:9 Display with Notch
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 636
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB (Expandable Upto 256GB)
बॅटरी : 5000 mAh Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.1
कॅमेरा : 16MP (f1.8) + 5MP f(2.2)
फ्रंट कॅमेरा : 12 MP (f/2.0)
रंग :  Black
सेन्सर : Fingerprint Reader (On the Back), Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, E-compass, Gyroscope, Magnetometer
इतर : USB Type-C with Turbo Charger Support, Dolby Audio, Dual Sim + microSD Card Slot, GPS/AGPS/GLONASS/Galileo, 3.5mm Audio Jack, Bluetooth 5.0, Gorilla Glass 3
किंमत – ₹१५,९९९

मोटोरोला वन पॉवर लिंक : फ्लिपकार्ट

या फोनची टक्कर नोकियाने काही दिवसांपूर्वीच सादर केलेल्या नोकिया ६.१ प्लस त्याचबरोबर शायोमीचा Mi A2, Honor 9N अशा फोन्स सोबत असेल.

Exit mobile version