फेसबुकवर आता 3D फोटोजचा अनुभव! : फोटोच्या आजूबाजूला पाहता येईल!

फेसबुकमध्ये आता नव्या फोन्सद्वारे काढलेल्या 3D फोटोजना सपोर्ट देण्यात आला असून 360 व्हिडिओ नंतर आता या थ्रीडी फोटोजमुळे नवा अनुभव घेता येईल! यामुळे फोटो शेअर करणं आणखी रंजक होईल असा विश्वास फेसबुकला वाटत आहे. हे थ्रीडी फोटो पाहण्यासाठी आपल्या न्यूजफीडवर असताना फोन वेगवेगळ्या अंशात थोडासा फिरवल्यास फोटोमधील वेगळ्या बाजू सुद्धा दिसतील. फोरग्राऊंड सोबत बॅकग्राऊंड चित्रित करून तो फोटो एकत्रित फेसबुक अॅपद्वारे शेअर करता येईल!   
 

हे 3D फोटो काढण्यासाठी तुमच्याकडे सपोर्ट असलेला स्मार्टफोन असायला हवा. सध्या तरी आयफोनच्या काही मॉडेल्सनाच (iPhone 7+, 8+, X, XS) सपोर्ट असून लवकरच अँड्रॉइड फोन्सना सुद्धा ही सोय उपलब्ध होईल. तर यापैकी ड्युअल लेन्स असलेला फोन असल्यास पोट्रेट मोडद्वारे फोटो काढा आणि  फेसबुक अॅपमधील Share as 3D फोटो पर्याय निवडून फोटो अपलोड करा. त्यामुळे तुमचा फोटो आता पॅन व टिल्ट, स्क्रोल करता येईल! खाली एक उदाहरण दिलेलं आहे ते सर्व फोन्सवर पाहू शकता. डेस्कटॉपवर असाल तर माउस फोटोवर हलवून 3D अनुभव घेता येईल.

अधिकृत माहिती : 3D Photos Now Rolling out on Facebook and in VR

search terms 3D photos in facebook adding new dimensions to photos how to create 3D photo for facebook 

Exit mobile version