Honor 8X स्मार्टफोन सादर : ऑनरच्या भारतातील विक्रीत ४००% वाढ!

ऑनर(Honor) तर्फे आज Honor 8X हा स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. Honor 8X स्मार्टफोन अॅमॅझॉन exclusive असून honor प्लॅटफॉर्मवर सुद्धा उपलब्ध असेल. नॅनो स्केल ऑप्टिकल कोटिंग, मागील बाजूस एकाच रंगाच्या दोन छटा असणारी ग्लास बॉडी, नॉच सोबत येणारा बॉर्डरलेस डिस्प्ले अशा गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

Honor 8X मध्ये Kirin 710 प्रोसेसर असून नॉच असणारा FHD+ डिस्प्ले, ग्लास बॉडी, मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर तसेच दोन वेगळ्या रंगाच्या छटा, अधिक क्षमतेची बॅटरीचा समावेश आहे.  त्याचबरोबर ड्युअल कॅमेरा, GPU Turbo, बोके मोड, फेस अनलॉक, ड्युअल VoLTE, सारख्या सुविधा आहेत. याबरोबरच ड्युअल सिमसोबत 400GB पर्यंत मेमरी वाढविण्यासाठी अधिकचा स्लॉट उपलब्ध आहे.

Honor 8X  २४ ऑक्टोबर पासून अॅमॅझॉनवर उपलब्ध असेल.

Honor Play Specification :
डिस्प्ले : 16.51cm (2340х1080) FHD+ Honor FullView Display (19.5:9)
प्रोसेसर : Kirin 710 Octacore (4 x 2.2 GHz + 4 x 1.7 GHz)
रॅम : 4/6 GB
स्टोरेज : 64/128 GB (Expandable Upto 400GB)
बॅटरी : 3750mAh
ऑपरेटिंग सिस्टिम : EMUI 8.2 ( Based on Android Oreo 8.1)
कॅमेरा : 20MP + 2MP Rear Camera
फ्रंट कॅमेरा : 16 MP
रंग :  Black, Blue
सेन्सर : Fingerprint Sensor, Proximity, Ambient Light Sensor, Compass, Gravity, Gyroscope
इतर : USB 2.0, Dual Sim Slot + microSD card slot , GPS, GlonaSS, BDS, 3.5mm Audio Jack, Bluetooth 4.2 + BLE,  Eye Comfort Mode, Glass Body with Visual Grating Effect, Dual VoLTE
किंमत – ₹14,999   (4GB + 64GB)
             ₹16,999   (6GB + 64GB
             ₹18,999   (6GB + 128GB))

लिंक  – Honor 8X on Amazonhihonor

Exit mobile version