नोकिया ३.१ प्लस स्मार्टफोन सादर : नोकीयाचा आता स्वस्त पर्याय उपलब्ध!

नोकिया ५.१ प्लस, ६.१ प्लसच्या यशानंतर नोकिया ब्रँड अंतर्गत स्मार्टफोन विक्री करणाऱ्या HMD ग्लोबलने नोकिया ३.१ प्लस स्मार्टफोन लाँच केला आहे त्याचबरोबर नोकिया ८११० ४जी फिचर फोन सुद्धा सादर करण्यात आला आहे. हे दोन्ही फोन्स या महिन्यातच उपलब्ध होणार असून नोकिया ३.१ प्लस १९ ऑक्टोबर तर नोकिया ८११० ४जी 24 ऑक्टोबरपासून ऑफलाईन तसेच nokia.com वर उपलब्ध होतील.

नोकिया ३.१ प्लसमध्ये 18:9 डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा, बोके इफेक्ट, बोथी मोड, स्टॉक अँड्रॉइड, फिंगर प्रिंट सेंसर, अधिक क्षमतेची बॅटरी यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय ड्युअल सिम सोबत 400GB पर्यंत मेमरी वाढविण्यासाठी अधिकचा स्लॉट उपलब्ध असेल.



Nokia 3.1 Plus Specifications
डिस्प्ले : 6 inch (1600х900) HD+ 18:9 Display
प्रोसेसर : MediaTek Helio P22
रॅम : 2/3GB
स्टोरेज : 16/32GB(Expandable Upto 400GB)
बॅटरी : 3500 mAh Battery
ऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.1
कॅमेरा : 13MP + 5MP
फ्रंट कॅमेरा : 8 MP
रंग : Blue,  Black, White
सेन्सर : Fingerprint Reader, Ambient Light Sensor, Proximity Sensor, Accelerometer, Gyroscope, NFC, E-compass.
इतर :  Dual Sim + microSD Card Slot, 3.5mm Audio Jack, Bluetooth 4.1, Material Toughened glass
किंमत – ₹११,४९९ (3GB+32GB)   १९ ऑक्टोबरपासून उपलब्ध.

लिंक – Nokia 3.1 Plus

नोकिया ८११० ४जी सुद्धा या कार्यक्रमात सादर करण्यात आला असून 24 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. यामध्ये स्लाइडर चा समावेश असून याद्वारे कॉल चालू/बंद करता येतील त्याचबरोबर वायफाय हॉटस्पॉट म्हणून सुद्धा वापरता येणार आहे तसेच नोकियाची प्रसिद्ध स्नेक गेम सुद्धा यामध्ये आहेच. या फोनसोबत जिओतर्फे डेटा ऑफर्स सुद्धा देण्यात येणार आहेत.

नोकिया 8110 4G सुविधा :
डिस्प्ले : 2.45-inch QVGA Curved Screen
प्रोसेसर : Qualcomm 205 mobile platform (MSM8905) 1.1 GHz
ओएस : KaiOS
कॅमेरा : 2-megapixel rear camera with LED flash
नेटवर्क : 4G LTE, वायफाय सपोर्ट, Support 4G hot spots
रॅम : 512MB,
स्टोरेज :  4GB (32 GB SD Card expansion slot))
बॅटरी : 1500mAh (Removable)
इतर : Bluetooth 4.1, FM radio आणि MP3 player, 3.5mm Audio Jack,
किंमत :  ₹5,999  (24 ऑक्टोबरपासून उपलब्ध)

लिंक – Nokia 8110 4G

Exit mobile version