पब्जीचा प्ले स्टोअरवर १० कोटी इन्स्टॉल्सचा टप्पा पार : लवकरच 0.9.0 अपडेट येत आहे!

अगदी काही महिन्यांतच प्रसिद्ध झालेल्या प्लेयर अननोन बॅटलग्राउंड (पब्जी – PUBG) या गेमने गूगल प्ले स्टोअरवरून १० कोटी इन्स्टॉलचा टप्पा पार  केला आहे. ऑगस्टमध्येच या गेमने प्ले स्टोअर सोबतच इतर ठिकाणचे मिळून १० कोटी डाउनलोड पूर्ण केले होते. पीसीसाठी उपलब्ध असलेली ही गेम मार्चमध्ये स्मार्टफोन्सवर मोफत उपलब्ध  झाली या गेमला गेमर मंडळींचा सध्या सर्वत्र मोठा प्रतिसाद लाभला आहे. ही गेम  २० कोटीहून अधिक वापरकर्ते दररोज खेळत आहेत.

२५ ऑक्टोबरपासून या गेमसाठी 0.9.0 अपडेटसुद्धा उपलब्ध होणार आहे. यामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले असून परफॉर्मन्समध्ये सुद्धा सुधारणा जाणवतील. Erangel map, नाईट मोड,  नवीन हॅलोवीन थीम, नवीन शस्त्रे, गाड्या, नाईट व्हिजन गॉगल,  पाहायला मिळणार आहे. सॅनहॉकमध्ये  QBU DMR ही नवी बंदूक मिळणार असून Rony pickup truck सुद्धा उपलब्ध होत आहे. spectator mode द्वारे आपल्याला ज्या प्लेयरने मारलं त्याचा पुढील गेमप्ले पाहता येणार आहे!

मागील महिन्यामध्ये या गेमसाठी 0.8.0 अपडेट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले होते नव्या अपडेटमध्ये QBZ, एक ऑटोमॅटिक रायफल व फ्लेयर गन (flare gun) देण्यात आली होती. त्याचबरोबर bulletproof UAZ बोलाविण्याचा पर्याय या अपडेटमध्ये होता तसेच मसल कार जी कॅन्व्हर्टिबलप्रमाणे वापरता येईल! वस्तू पिकअप करताना किती वस्तू उचलल्या जातील हे सुद्धा या अपडेटमध्ये निवडता येत होते.

मध्यंतरी जाहीर झालेल्या भारतातील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असून लाईव्ह पाहू शकता : PUBG Mobile | Oppo F9 Pro Campus Championship India 2018

या गेम साठी एम्युलेटर सुद्धा उपलब्ध असून याद्वारे पीसीवर मोबाइल व्हर्जन मोफत खेळता येतं…!

Exit mobile version