PUBG Mobile तर्फे भारतात कॉलेज विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा : पन्नास लाखांची बक्षिसे!

प्लेयर अननोन बॅटलग्राउंड (पब्जी - PUBG) ही सध्या खूप लोकप्रिय गेम आहे सध्या जगभरात लाखो गेमर्स ही गेम ऑनलाईन खेळत असतात. तर या PUBG Mobile ची कंपनी टेनसेंट गेम्स (Tencent Games) ने कॉलेज विद्यार्थ्यांसाठी PUBG Mobile स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचं नाव PUBG Mobile Campus Championship 2018 असू स्पर्धा  विद्यार्थ्यांसाठी खुली आहे जवळपास ३० शहरातील १००० कॉलेजेसचे विद्यार्थी यात भाग घेऊ शकतील! ५० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे यामध्ये देण्यात येणार आहेत! ही स्पर्धा २६ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबरपर्यंत चालेल! अंतिम सामने बेंगळुरूमध्ये होतील. डेव्हलपर्सनी ही भारतातील आजवरची सर्वात मोठी इ-स्पोर्ट्स स्पर्धा असल्याचा दावा केला आहे.

ही बक्षिसे ओप्पोतर्फे प्रायोजित केलेली असतील आणि हे सामने सोशल मीडियाद्वारे स्ट्रीम केले जातील. चार जणांनी ऑनलाईन संघ तयार करून यामध्ये भाग घ्यायचा आहे. या स्पर्धेची नोंदणी सुरु असून ७ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करता येईल.
नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट :  pubgmobile.in/2018/
खालील प्रकारे वर्गवारीनुसार खास बक्षिसेसुद्धा  दिली जातील!
MVP - Overall Best Player with maximum number of MVP awards
The Executioner - Awarded for maximum kills overall
The Medic – Awarded for highest number of revives
The Redeemer – Awarded to the player with highest amount of health restored
The Rampage Freak - Awarded for maximum kills in one lobby
The Lone ranger - Awarded for Maximum Time Survived in game

भारतात इ स्पोर्ट्स गेमिंग लोकप्रिय करण्यात अशा स्पर्धा नक्कीच काम करतील. अनेक वर्षं काउंटर स्ट्राईक, डोटा अशा गेम्स आजही अनेक मित्रांना सोबत घेऊन लॅन/ऑनलाईन खेळल्या जातात. आता यासोबत बक्षिसे मिळत असतील तर हा प्रकार नक्कीच लोकप्रिय होणार. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही देशात गेमिंगला अधिकृतरित्या खेळाचा दर्जा देण्यात आलेला आहे.     


search terms : pubg mobile Campus Championship 2018 marathi 
PUBG Mobile तर्फे भारतात कॉलेज विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा : पन्नास लाखांची बक्षिसे! PUBG Mobile तर्फे भारतात कॉलेज विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा : पन्नास लाखांची बक्षिसे! Reviewed by Sooraj Bagal on September 08, 2018 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.