AMD चं नवं ग्राफिक्स कार्ड RX590 सादर : 1080p गेमिंगसाठी उत्तम पर्याय

एएमडी कंपनीने त्यांचा नवा GPU सादर केला असून याचं नाव AMD Radeon RX 590 असं असणार आहे आणि हा RX 580 नंतरचा नवा पर्याय असणार आहे. इतर गोष्टी बऱ्यापैकी सारख्याच असल्या तरी RX 590 २० टक्के अधिक चांगल्या प्रकारे काम करेल!

Nvidia च्या NVIDIA GTX 1060 सोबत या ग्राफिक्स कार्डची स्पर्धा असेल. गेल्या काही वर्षात AMD ने प्रोसेसर विश्वात इंटेलला आणि GPU क्षेत्रात Nvidia ला मोठी स्पर्धा उभी केली आहे. थेट स्पर्धेत जरी ते मागे असले तरी कमी किंमतीत जवळपास सारखीच कामगिरी करताना पाहायला मिळतात. नवे GPU जुन्या 14nm ऐवजी 12nm प्रक्रियेद्वारे केलेले असतील. यामध्ये 8GB ची GDDR5 मेमरी असून Thermal Design Power (TDP) हा 225W इतका असेल या RX590 ची किंमत $279 (~₹२०,०००) आहे. एसूस, पॉवरकलर, XFX, सॅफायर यांनी बनवलेले RX 590 GPU बाजारात उपलब्ध होत आहेत.

AMD यामध्ये आणखी एक गोष्ट जोडली असून ज्याद्वारे आपल्याला RX मालिकेतील ग्राफिक्स कार्ड्सवर Devil May Cry 5, Tom Clancy’s The Division 2 व Resident Evil 2 या गेम्स मोफत मिळणार आहेत! या गेम्स मात्र जानेवारी ते मार्च दरम्यानच उपलब्ध होतील. 

Exit mobile version