DJI चा ऑस्मो पॉकेट सादर : हातात मावणारा कॅमेरा गिंबल!

डीजेआय या ड्रोन फोटोग्राफी उपकरणामध्ये आघाडीवर असणार्‍या कंपनीने नवा ऑस्मो पॉकेट नावाचा कॅमेरा आणला असून यामध्ये गिंबलची जोड देण्यात आली आहे ज्यामुळे व्हिडीओ काढताना कॅमेरा एकाच जागी स्थिर राहतो !  गोप्रो अॅक्शन कॅमेरा प्रमाणेच काम करत असला तरी दोघांमध्ये फार फरक आहे. ऑस्मो पॉकेट म्हणजे ड्रोनचा कॅमेरा हातात स्टॅबिलायझर जोडून वापरणारं उपकरण म्हणता येईल. याची किंमत $349 (~₹ २४,५००) असेल आणि हा १५ डिसेंबरपासून उपलब्ध होईल.

Osmo Pocket चार इंची आकाराचा असून याचं वजन केवळ ११६ ग्रॅम्स आहे. बंद केल्यावर याचा कॅमेरा स्वतःला वळवून ठेवतो ज्यामुळे हा कॅमेरा छोट्या केसमध्ये सहज बसेल. ऑस्मो मोबाईल मध्ये वापरल्या जाणाऱ्या मोठ्या कॅमेरा ऐवजी यामध्ये मॅव्हिक एअर सारख्या ड्रोन्समध्ये वापरला जाणारा लहान कॅमेरा देण्यात आला आहे.

यामधील गिंबल three-axis प्रकारचं असून कॅमेरा 1/2.3 इंची सेन्सर असलेला आहे जो 4K 60 fps व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो आणि १२ मेगापिक्सलचे फोटो काढू शकतो! ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी दोन माइक देण्यात आले आहेत.  नियंत्रित करण्यासाठी एक छोटा टचस्क्रिन असलेला डिस्प्लेसुद्धा असून याद्वारे सर्व पर्याय पाहून बदलता येतील! यासोबत एक USB अडॅप्टर मिळेल जो आपल्या फोनला जोडून ऑस्मो पॉकेटमधील लाईव्ह व्ह्यू फोनमध्ये पाहता येईल!

DJI Osmo Pocket Specs :
Sensor : 1/2.3” CMOS
Effective pixels: 12M
Lens : FOV: 80° F2.0
ISO Range : Photo: 100-3200 । Video: 100-3200
Electronic Shutter Speed : 8s-1/8000s
Max Image Size : 4000×3000 pixels
Still Photography Modes : Single Shot, Panorama, Timelapse, Motionlapse
Video Resolution : 4K Ultra HD : 3840×2160 24/25/30/48/50/60p
FHD : 1920×1080 24/25/30/48/50/60
Video Recording Modes Auto
Max Video Bitrate 100 Mbps
BATTERY : Type LiPo : 875 mAh

Exit mobile version