आयफोनवरील Gboard आता मराठीत : सोबत अनेक नव्या सोयी!

अँड्रॉइड व iOS वर प्रसिद्ध असलेला गूगलचा Gboard अँड्रॉइडवर मराठी भाषेला कित्येक महिन्यांपासून सपोर्ट करतोय मात्र आयफोनवर हा कीबोर्ड मराठीत उपलब्ध नव्हता. आता नव्या अपडेटद्वारे आयफोन्स, आयपॅड्सवर सुद्धा मराठीत टाईप करणं सहजसोपं झालं आहे. या अपडेटमध्ये बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू भाषांना सुद्धा सपोर्ट जोडण्यात आला आहे. सोबतच आता या अपडेटमध्ये अनेक सोयी स्मार्ट सुविधा जसे कि आपण पुढे कोणती इमोजी, GIFs किंवा स्टिकर पाठवणार आहे याबद्दल AI चा (कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर करत अंदाज करून स्वतः समोर आणून देईल ज्यामुळे आपण लगेच ती इमोजी निवडून पाठवू शकू!
Gboard च्या Version 1.37.0 मध्ये हे सर्व बदल पाहायला मिळतील.

यामध्ये ट्रान्सलिटरेशनची सोय आहे त्यामुळे आपण हव्या असलेल्या शब्दाचं इंग्रजी स्पेलिंग लिहिलं की मराठीत टाईप झालेलं दिसेल… उदा. ‘solapur’ असं टाईप केलं की ‘सोलापूर’ असं टाईप होईल…
   
आयफोनवर मराठी टायपिंगसाठी :  

  1. iPhone किंवा iPad वर Gboard इंस्टॉल करा.  
  2. आता ज्या ठिकाणी टाईप करायचं आहे ते अॅप उघडा उदा. Gmail, Messaging   
  3. कीबोर्डच्या तळाशी पृथ्वीचं आयकॉन (🌐) असेल त्यावर टॅप करून दाबून धरा.  
  4. आता Settings आणि मग Languages
  5. Add language वर टॅप करा.  
  6. इथे मराठी निवडा आणि आता तुमचा आयफोन मराठीत टाईप करण्यासाठी तयार…!
कीबोर्ड लेआऊट बदलण्यासाठी
  1. Settings उघडा 
  2. General पर्याय निवडा
  3. आता Keyboard मग Keyboards.
  4. आणि आता तुम्हाला हवा असलेला लेआऊट निवडा
Gboard ची वैशिष्ट्ये :
१. कुठल्याही अॅपमध्ये टाईप करता करताच इंटरनेटवर हव्या त्या गोष्टीचा सर्च करता येतो
२. समजा व्हॉटसअॅप चॅटवर व्हिडीओ शेअर करायचा आहे, तर व्हॉटसअॅपमध्येच किबोर्डवर सर्च करून ती लिंक लगेच पोस्ट करता येते. आहे न कमाल !
३. इमोजी शोधता येतात. टाईप केलेल्या मजकुरावरून ईमोजी आपोआप सुचवल्या जातात!
४. GIF  ऍनिमेशन्स किबोर्डमध्येच सर्च करून जोडण्याची सोय!
५. टाईप करता करता भाषांतर करण्याची सोय!
६. रंगसंगती/थिम्स उपलब्ध, आयफोन व अँड्रॉइड दोन्हीसाठी उपलब्ध!
७. आता मराठीमध्येसुद्धा उपलब्ध (१२० हुन अधिक भाषा एकाच कीबोर्डमध्ये!)
८. ट्रान्सलिटेशन सपोर्ट म्हणजे “Google” असं स्पेलिंग टाईप केल्यास “गूगल” असे टाईप होईल!
९. हा कीबोर्ड जसजसे टाईप कराल तसतसं शिकत जातो आणि अधिक सहज शब्द सुचवतो जेणेकरून टायपिंग अधिक सोपं आणि लवकर होतं!
१०. iOS 12.1 मधील नव्या इमोजींना सपोर्ट!

Download Links :

search terms marathi typing on iphone iOS iPad easy way Google Gboard Keyboard app for iOS in Marathi

Exit mobile version