सॅमसंगचा डिस्प्लेमध्येच फ्रंट कॅमेरा असलेला A8s सादर!

सॅमसंगने डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा असलेला जगातला पहिला स्मार्टफोन सादर केला असून या नव्या प्रकारच्या रचनेला सॅमसंगने Infinity-O डिझाईन असं नाव दिलं आहे! हा गॅलक्सी A8s फ्रंट कॅमेरासाठी नॉचऐवजी डिस्प्लेमध्येच छिद्र पडल्याप्रमाणे दिसतो म्हणून याला पंचहोल डिस्प्लेसुद्धा म्हटलं जात आहे! सॅमसंगने शेवटपर्यंत नॉच असलेला फोन सादर केलाच नाही आणि सगळ्या ट्रेंडपासून अलिप्त राहत स्वतःचं नवं डिझाईन सादर केलं! यांच्यानंतर लगेचच Honor View 20 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचा डिस्प्ले पाहायला मिळेल!

Samsung Galaxy A8s सुविधा :
डिस्प्ले : 6.4’’ 1080 x 2340 pixels, 19.5:9 ratio
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie
रॅम : 6GB/8GB 
प्रोसेसर (CPU) : Qualcomm Snapdragon 710
GPU : Adreno 616
स्टोरेज : 128GB + MicroSD card slot Support for up to 512 GB

कॅमेरा : 24 MP, f/1.7, PDAF + 10 MP, AF + 5 MP, f/2.2, depth sensor
(होय या फोनमध्ये पाठीमागे तीन कॅमेरे आहेत!)
फ्रंट कॅमेरा : 24 MP, f/2.0

सेन्सर्स : Fingerprint (rear-mounted), accelerometer, gyro, proximity, compass
बॅटरी : 3400 mAh fast charging
इतर : WiFi 802.11 b/g/n/ac, Bluetooth® 5.0 ,USB Type-C
रंग : Blue, Gray, Green

Exit mobile version