अॅमेझॉन अलेक्सा उपकरणांची विक्री १० कोटींवर!

अलेक्साचा समावेश असलेले दहा कोटीहून अधिक डिव्हाईस जगभर विकले गेले आहेत असं आज जाहीर करण्यात आलं आहे ! अलेक्सा ही अॅमेझॉनने विकसित केलेली व्हर्च्युअल असिस्टंट असून या असिस्टंटचा समावेश असलेली इको डॉट, इको स्पीकर, इको प्लस, इको स्पॉट अशी विविध उपकरणे जगभर विकली जात आहेत! गूगलची गूगल असिस्टंट, अॅपलची सिरी, मायक्रोसॉफ्टची कोर्टाना, सॅमसंगचा बिक्स्बी ही व्हॉईस असिस्टंट्स सध्या बाजारात आघाडीवर आहेत. केवळ असिस्टंटचा समावेश असलेल्या उपकरणाच्या विक्रीत मात्र अॅमेझॉनची आघाडी बरीच पुढे आहे असं आज जाहीर झालेल्या आकड्यांवरून म्हणता येईल!

इतर असिस्टंट्स (उदा. गूगल असिस्टंट/ अॅपल सिरी) फोनद्वारे सोबतच दिले गेले असल्यामुळे त्यांना स्वतंत्र असिस्टंट उपकरणांमध्ये गणता येणार नाही. अन्यथा त्यामध्ये गूगल/अॅपलच्या असिस्टंटनी वर्चस्व सिद्ध केलेलं आहेच! अॅमेझॉनच्या अलेक्साचा आता जवळपास १५० प्रकारच्या उत्पादनांमध्ये २८००० स्मार्ट होम उपकरणामध्ये समावेश आहे जे ४५०० वेगवेगळ्या कंपन्यांनी बनवले आहेत! यामध्ये ७०००० अलेक्सा स्किल्सची जोड देण्यात आली आहे!

Buy Amazon Alexa on Amazon

अॅमेझॉन अलेक्सा विकत घेण्यासाठी लिंक
Exit mobile version