गूगल वेब रेंजर्स स्पर्धा : विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षेबाबत प्रसाराची संधी

गूगलने काही दिवसांपूर्वी या स्पर्धेबद्दल घोषणा केली होती. आता या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. भारतामध्ये डिजिटल सिटीझनशिप व इंटरनेट सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचं आव्हान या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.

वेब रेंजर म्हणजे कोण? : आपलं वय १० ते १७ दरम्यान असेल आणि ऑनलाइन विश्वामध्ये सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवं हे ठाऊक असेल व या बाबतीत तुम्ही आपल्या शेजार्‍यांना/नातेवाईकांना मदत करत असाल तर तुम्ही वेब रेंजर आहात!

१० ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना ही स्पर्धा खुली असून देशभरातील कोणताही विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. स्पर्धेत भाग घेण्याची मुदत २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
ही स्पर्धा जगभर आयोजित केली जाते आणि याची भारतातील सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील कल्पकतेला वाव देऊन साबर सुरक्षेच महत्व अधोरेखित करायचं आहे.

स्पर्धेबद्दल माहिती व सहभागासाठी लिंक : events.withgoogle.com/webrangersindia

विद्यार्थ्यांना खालील दोन फॉरमॅटपैकी एकामध्ये भाग घ्यायचा आहे.
Campaign: एकमेकानाशी संवाद साधून कॅम्पेनद्वारे आपल्या परिसरातील नागरिकांशी संपर्कात राहून इंटरनेटविषयी जागरूकता निर्माण करायची आहे. यासाठी ग्रुपमध्ये काम करता येईल हा ग्रुप ३ पेक्षा अधिक जणांचा नसावा.
Project: या फॉरमॅटमध्ये तुम्हाला वेबसाइट/अॅप/व्हिडीओ तयार करायचा आहे. मात्र यापैकी पर्याय वापरताना योग्य माहिती विश्वासू संदर्भ वापरून दिलेली असावी.

Eligibility
• Indian resident
• Students aged between 10-17
• Students will need to be enrolled in a school or registered to be home schooled in India
• The submission for the entry should be from parents/guardians only
• To know more : webrangersindia

search terms google web rangers contest competition marathi information

Exit mobile version