आता हुवावेचा घडी घालता येणारा फोन Mate X सादर!

काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या सॅमसंग गॅलक्सी फोल्डला आता स्पर्धक उपलब्ध झाल्या असून हुवावे कंपनीने त्यांचा Mate X हा घडी घालता येणारा फोन MWC (मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०१९) मध्ये सादर केला आहे! विशेष म्हणजे हुवावेचा हा फोन अधिक मोठ्या डिस्प्लेसह कमी आकाराचा आणि आणखी सपाट घडी घालता येईल असा आहे!

Huawei Mate X (Image : The Verge)

या फोनची जाडी 11mm असून उलगडल्यावर याचा 8 इंची OLED डिस्प्ले पहायला मिळतो. यामध्ये 5G तंत्रज्ञानाचा वापर केलेला असून हुवावेचा स्वतःचा Kirin 980 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची बॅटरी 4500mAh इतकी आहे जी 55W फास्ट चार्जर द्वारे ० ते ८५ टक्के अवघ्या अर्ध्या तासात चार्ज होते!

Huawei Mate X Specs :
डिस्प्ले : 8″ 2480 x 2200
घडी घातल्यावर 6″ 2480 x 1148
प्रोसेसर : HUAWEI Kirin 980 + Balong 5000
रॅम : 8GB RAM (LPDDR4X)
स्टोरेज : 512GB MicroSD slot (up to 256GB)
कॅमेरा : Triple Camera
– Telephoto: 8MP
– Wide-angle: 40MP
– Ultra Wide: 16MP
फ्रंट कॅमेरा :
बॅटरी : 4500mAh with 55 W HUAWEI SuperCharge
ऑपरेटिंग सिस्टिम : EMUI 9.1.1 based on Android 9 Pie
इतर : Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax (2.4/5GHz) Wifi, Bluetooth 5.0, NFC, USB Type-C
सेन्सर्स : Gravity Sensor, Ambient Light Sensor, Proximity Sensor, Gyroscope, Compass, Fingerprint Sensor, Hall sensor, Barometer, Infrared sensor, colour temprature sensor
किंमत : (भारतीय किंमत नंतर सांगण्यात येईल)

Exit mobile version