अॅपलचे नवे आयपॅड सादर : आयपॅड मिनी आता पेन्सिल सपोर्टसह!

अॅपलने बर्‍याच दिवसांनी त्यांच्या लहान स्क्रिन्स असलेल्या आयपॅड्सना नव्या रूपात सादर केलं असून यामध्ये आता नवा प्रोसेसर असेल आणि अनेकांना आवडेल अशी गोष्ट म्हणजे अॅपल पेन्सिलचा सपोर्ट! यामुळे या लहान टॅब्लेट्सवरही आता चित्रं काढण्यासाठी, एडिटिंगसाठी अॅपल पेन्सिल या स्टायलसचा वापर करता येईल! अॅपल पेन्सिलसह स्मार्ट किबोर्डचाही सपोर्ट नव्याने जोडण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा टॅब्लेट एक चांगला पर्याय होऊ शकेल. बाकी सर्व्क ग्राहक ज्यांना लहान आकाराचा चांगली कामगिरी करणारा व अॅपल पेन्सिलचा वापर करू शकणारा असा हा टॅब्लेट आहेच…!

मात्र अॅपल काही महिन्यापूर्वी आलेल्या नव्या आयपॅड प्रोमधील बऱ्याच साध्या सुविधाही यामध्ये दिलेल्या नाहीत. (उदा. Type C पोर्ट, फेसआयडी). जुनंच हार्डवेयर नव्या प्रोसेसर पेन्सिल सपोर्ट सह सादर करण्यात आलं आहे म्हटलं तरी हरकत नाही!

iPad Mini 2019 Specs :
डिस्प्ले : 7.9-inch Retina display (2,048×1,536-pixel resolution)
कॅमेरा : 8-megapixel rear camera, 7-megapixel FaceTime camera
प्रोसेसर : A12 Bionic processor with Neural Engine
स्टोरेज : 64GB or 256GB
बॅटरी : 10 hours of battery life
इतर : Touch ID, Lightning connector, 3.5mm headphone jack, Support for eSIM, Support for the original Apple Pencil (ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेली नवी पेन्सिल नव्हे!)
रंग : Space gray, silver and gold
किंमत : $399 पासून पुढे

iPad Air 2019 Specs :
डिस्प्ले : 10.5-inch Retina (2,224×1,668-pixel resolution)
कॅमेरा : 8-megapixel rear camera, 7-megapixel FaceTime camera
प्रोसेसर : A12 Bionic processor with Neural Engine
स्टोरेज : 64GB or 256GB
बॅटरी : 10 hours of battery life
इतर : Touch ID, Lightning connector, 3.5mm headphone jack, Support for eSIM, Support for the original Apple Pencil (ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेली नवी पेन्सिल नव्हे!)
रंग : Space gray, silver and gold
किंमत : $499 पासून पुढे

अॅपल आयपॅड २०१९ मधील उत्पादने!
Exit mobile version