फ्लिपकार्टमध्ये वस्तूंच्या वर्गीकरणासाठी रोबॉट्स!

फ्लिपकार्टने भारतात प्रथमच रोबॉट्स आधारित तंत्रज्ञान आणलं आहे जे त्यांच्या वस्तूंचं वर्गीकरण करेल. फ्लिपकार्टच्या बेंगलुरूमधील वस्तु वर्गीकरण करून पुढे पाठवण्याच्या ठिकाणी हे रोबॉट्स आता तासाला ५००० पार्सल सॉर्ट करून देतील! हेच काम करण्यासाठी मानवी हातांना ताशी ४५० एव्हढ्या कमी प्रमाणात जमत होतं!

ऑटोमेटेड गायडेड व्हेइकल्स (AGV) स्वतःला दर आठ तासांनी चार्ज करतात. यामुळे करी करण्याची क्षमता दहा पटीने वाढल्याच फ्लिपकार्टकडून सांगण्यात आलं आहे! यांचा कायम एकमेकांशी डिजिटल संवाद सुरू असतो जेणेकरून यांची फिरताना धडक होऊ नये. अनेक सेन्सर्स जोडून त्यांना एका सॉफ्टवेअर द्वारे नियंत्रित केलं जातं. त्यामुळे एकमेकांच्या वाटा समजून घेत हे रोबॉट्स काम करत राहतात. फ्लिपकार्टच्या सौक्य, बेंगलुरू येथील फॅसिलिटीमध्ये १०० रोबॉट्स वापरात आणले गेले आहेत. यामुळे अधिक ग्राहकांना अधिक वेगाने सेवा पुरवता येईल असं कृष्णा राघवन यांनी फ्लिपकार्टतर्फे सांगितलं आहे.

फ्लिपकार्टचे भारतातील प्रमुख स्पर्धक अॅमेझॉनकडे असे रोबॉट्स २०१४ पासूनच काम करत आहेत! २०१७ मध्ये त्यांच्याकडे असे तब्बल एक लाखाहून अधिक रोबॉट्स होते! काही महिन्यात डिलिव्हरीसाठीही सर्वत्र असे रोबॉट्स वापरण्याची त्यांची महत्वाकांक्षा आहे!

यामुळे सर्वाधिक उपस्थित केला जाणारा प्रश्न येतो तो म्हणजे रोबॉट्स आता मानवी हातांचं काम हिरावून घेत जातील आणि बेरोजगारी वाढीस कारणीभूत ठरेल…यावर फ्लिपकार्टने तर सध्या आम्ही कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवाढीसाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं आहे. तुम्हाला काय वाटतं ?

Search Terms : Flipkart installs new robots to sorting facility in Bengaluru

Exit mobile version