यूट्यूब म्युझिक आता भारतात उपलब्ध!

सादर होऊन अनेक महिने उलटल्यावर यूट्यूब म्युझिक सेवा आता भारतात उपलब्ध झाली आहे. स्पॉटिफायला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून गूगलला सुद्धा भारतीय संगीत क्षेत्रात प्रवेश करावा वाटला असेल. यूट्यूब म्युझिक सोबत यूट्यूब प्रीमियम, यूट्यूब म्युझिक, यूट्यूब ओरिजिनल्ससुद्धा आता भारतात उपलब्ध झाल्या आहेत!

गेल्या जूनमध्ये इतरत्र उपलब्ध असलेल्या YouTube Premium, YouTube Originals व YouTube Music या सेवा आजपासून भारतात उपलब्ध आहेत. यूट्यूब म्युझिकमध्येही हजारो गाणी ऐकण्यासाठी मिळतील. याला गूगलच्या स्मार्ट सजेशन्सची जोड दिलेली असल्यामुळे एखाद्या संगीतकाराच गाणं ऐकताच पुढे लगेचच संबंधित गाणी व इतर संगीतकार, गायक दिसू लागतील! यूट्यूब म्युझिकची खासियत म्हणजे ऑडिओ सोबत व्हिडिओसुद्धा पाहता येऊ शकतो!
जिओ सावन, गाणा, हंगामा, Wync, अॅमेझॉन प्राईम म्युझिक, अॅपल म्युझिक, स्पॉटिफाय इ पर्याय भारतीय संगीत शौकिनांना आधीच उपलब्ध आहेत. यूट्यूब म्युझिकमध्ये खास प्लेलिस्ट्स, स्मार्ट सर्च, गाजत असलेले व्हिडीओज, गाणी डाउनलोड अशा सोयी आहेत.

ही सेवा मोफत वापरता येते मात्र मोफत सेवे दरम्यान जाहिराती दाखवल्या/ऐकवल्या जातील. मात्र जर यूट्यूब म्युझिक प्रीमियम या सेवेची नोंदणी घेतली तर जाहिरातीशिवाय गाणी ऐकता येतील बॅकग्राऊंडमध्येही प्ले करता येतील जे अनेकांना नक्कीच आवडेल. गाणी डाऊनलोड करून ऑफलाइनसुद्धा ऐकता येतील. YouTube Music Premium ९९ रुपये दरमहा दरात उपलब्ध आहे.

YouTube Music Link : https://music.youtube.com

YouTube Premium : या सेवेला आधी यूट्यूब रेड म्हटलं जायचं. अॅड फ्री म्हणजे जाहिरातींशीवे यूट्यूब वापरण्याच्या अधिकृत मार्ग आता भारतात उपलब्ध झाला आहे. यातसुद्धा यूट्यूबवरील व्हिडिओ डाऊनलोड करून ऑफलाइन पाहता येण्याची सोय आहेच. ही सेवा १२९ रुपये दरमहा या दराने उपलब्ध असून याच किंमती अंतर्गत यूट्यूब म्युझिक प्रीमियमसुद्धा जोडलेली असेल.

YouTube Originals : या यूट्यूबने स्वतः बनवलेल्या खास मालिका/चित्रपट असून सध्यातरी यांना फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. काही कालावधीने यूट्यूबने यामध्ये अधिक गुंतवणूक केल्यास अधिकाधिक कंटेंट पहायला मिळेल…

Exit mobile version