गूगल क्रोम ७४ अपडेट आता उपलब्ध : डार्क मोडसह!

गूगलने आज त्यांच्या लोकप्रिय क्रोम ब्राऊजरला नवं ७४ अपडेट उपलब्ध करून दिलं असून यामध्ये काही सोयी नव्याने जोडण्यात आल्या आहेत. हे अपडेट आजच विंडोज, मॅक, लिनक्स, अँड्रॉइडवर मिळेल. काही नव्या सुविधा आणि सुरक्षेसंबंधित बग फिक्सेस पाहायला मिळतील. विशेष सुविधा म्हणजे मॅक नंतर आता विंडोजवरही डार्क मोड उपलब्ध होतोय ज्यामुळे सर्व मेन्यू पांढर्‍या ऐवजी काळ्या रंगात दिसतील. यामुळे डोळ्यावरचा ताण कमी होण्यास मदत होते.

हा डार्क मोड सुरू करण्यासाठी सध्यातरी क्रोममध्ये सेटिंग्स नाहीयेत. तुम्ही जर विंडोज १० च नवं अपडेट वापरत असाल तर Personalize > Colors > Choose Your Default App Mode > Dark असा बदल करून सर्व कम्प्युटर डार्क मोडमध्ये वापरू शकाल. यामुळे क्रोममधील पंधरा रंग डार्क मोडमध्ये बदलेलला दिसेल.

यासोबत डेव्हलपर्ससाठी काही नव्या सोयी देण्यात आल्या आहेत. क्रोम अँड्रॉइडमध्ये Data Saver ला आता Lite Mode हे नवं नाव देण्यात आलं आहे. क्रोममध्ये आता वेबसाइट डेव्हलपर्सना मोशन सिकनेस कमी करण्यासाठी पर्याय देता येणार असून यामुळे वेबसाइट पाहताना कधीकधी डिझाईनमधील भागांमुळे स्क्रोलिंगवेळी होणार्‍या हालचालींचा त्रास होतो तो कमी होईल!

टीप : क्रोम ७४ अपडेट किंवा यामधील नवे बदल तुम्हाला दिसत नसतील तर आणखी काही दिवस वाट पहावी लागेल. या अपडेटची रोलआऊट प्रक्रिया सुरू आहे.

Exit mobile version