सॅमसंग A70, A80 सादर : आता पूर्ण फिरणार्‍या कॅमेरासह!

अलीकडे आलेल्या मोठ्या डिस्प्लेच्या ट्रेंडमुळे नंतर नॉचचे फोन्स येण्यास सुरुवात झाली. मग तो नॉच लहान करण्याची स्पर्धा सुरू झाली आता अनेकांनी वॉटरड्रॉप नॉचची सुरुवात केली आहे. काही जणांनी मोटर असलेले कॅमेरा दिले जे फ्रंट कॅमेरा अॅप उघडताच वर येतात आणि बंद केल्यास परत फोनमध्ये जाऊन बसतात. सॅमसंगचा आज सादर झालेला हा फोन त्याच प्रकारच्या तंत्रावर काम करतो मात्र फ्रंट व बॅक अशा दोन्हीसाठी एकच कॅमेरा वापरला जाईल. फ्रंट फोटोची विनंती करताच फोन त्या कॅमेराला पूर्णपणे फिरवून समोर आणून ठेवेल!

ही कॅमेरा फिरवण्याची कल्पना फारशी नवीन नाही. काही वर्षांपूर्वी ओप्पो सारख्या कंपन्यांनी याची सुरुवात केली होती. सॅमसंगने मोटराईझ्ड आणि रोटेटिंग अशा दोन कल्पना एकत्र जोडून आजचा हा फोन सादर केला आहे. या फोन्सचं हेच वैशिष्ट्य असून इतर गोष्टी नेहमीप्रमाणेच देण्यात आल्या आहेत.

Samsung Galaxy A80 Specs
डिस्प्ले : 6.7-inch FHD+ (1080×2400) Super AMOLED, Infinity Display
प्रोसेसर : Snapdragon 730 Octa Core (2.2GHz Dual + 1.8GHz Hexa)
GPU : Adreno 618
रॅम : 8GB
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : Main: 48MP, F2.0 + Ultra Wide: 8MP, F2.2 (123°) + 3D Depth
Rotating Camera असल्यामुळे फ्रंट व बॅक दोन्हीसाठी तोच कॅमेरा वापरता येईल!
बॅटरी : 3700mAh 25W Fast Charge Support
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 9.0 (Pie) Samsung One UI
इतर : Type-C USB 2.0, Bluetooth 5.0, GPS
सेन्सर्स : In-Screen Fingerprint, accelerometer, gyro, proximity, compass
रंग : Phantom Black, Angel Gold, Ghost White
किंमत : EUR 649 (~₹ ५०,५००) भारतीय किंमत अद्याप जाहीर नाही

या फोनसोबत सॅमसंगने आता A30, A50, A70, A80 हे फोन्स त्यांच्या A मालिकेमध्ये सादर केले आहेत. चीनी कंपन्यांसोबत स्पर्धा करण्याचा सॅमसंगचा हा नवा प्रयत्न असून किती यशस्वी होईल ते नंतर कळेलच…

https://youtu.be/eW3yuqFebHs
Exit mobile version