यूट्यूब अॅप अॅमेझॉन फायर टीव्हीवर पुन्हा उपलब्ध!

गूगल व अॅमेझॉन मध्ये नव्याने झालेल्या करारानुसार बरेच महीने फायर टीव्हीवरून वापरता येत नसलेल यूट्यूब आता पुन्हा सहज वापरता येईल. तसेच अॅमेझॉननेही त्यांच्या प्राइम व्हिडिओ सेवेला आता गूगल क्रोमकास्ट सपोर्ट जोडत असल्याच जाहीर केलं आहे! दोन्ही कंपन्यांनी काही महिन्यांपूर्वी स्पर्धेमुळे एकमेकांच्या प्लॅटफॉर्मवरून आपल्या सेवा बंद केल्या होत्या. मात्र यामुळे ग्राहकांना विनाकारण अडचणी होऊन दुसरे पर्याय शोधत असल्याच पाहून बहुधा हा निर्णय घेण्यात आला असावा.

या नव्या मैत्रीमुळे फायर टीव्ही वापरणार्‍या ग्राहकांना महत्वाची गोष्ट मिळेल ती म्हणजे अधिकृत Certified YouTube Support ज्यामुळे फायर टीव्हीवर अधिकृत यूट्यूब अॅप उच्च गुणवत्तेमध्ये व्हिडिओ दाखवू शकेल! फायर टीव्ही हे उपकरण आपल्या टीव्हीला जोडून आपण त्यावर अॅमेझॉनच्या प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स सारख्या सेवांचा आनंद घेऊ शकतो. यासोबत एक रिमोटसुद्धा ज्यावर अलेक्सा हा डिजिटल व्हॉईस असिस्टंट उपलब्ध आहे ज्याला आपण प्रश्न उत्तरे विचारू शकतो व आज्ञा देऊ शकतो!

गूगलच्या या कृतीवर अॅमेझॉननेही त्यांची व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा प्राइम व्हिडिओला गूगलच्या स्ट्रिमिंग स्टिक क्रोमकास्टला सपोर्ट जाहीर केला त्यामुळे ज्यांच्याकडे क्रोमकास्ट असेल ते आता स्वतंत्र अॅपद्वारे प्राइम व्हिडिओमधील चित्रपट व मालिका पाहू शकतील!

हे अॅपमधील बदल कधी पूर्ण होतील हे मात्र जाहीर करण्यात आलेलं नाही मात्र येत्या काही महिन्यात हा बदल झालेला नक्की दिसून येईल व ग्राहकांना नक्कीच या सेवा वापरण सोपं जाईल!

अपडेट (९-७-२०१९) : यूट्यूब अॅप अॅमेझॉन फायर टीव्हीवर उपलब्ध झालं आहे!

Exit mobile version