Android Q प्रीव्यू सादर : अँड्रॉइडची नवी आवृत्ती चाचणीसाठी उपलब्ध!

गूगलच्या I/O 2019 कार्यक्रमात गूगलने त्यांच्या लोकप्रिय स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइडच्या पुढील आवृत्तीबद्दल बरीच माहिती जाहीर करत याचा प्रीव्यूसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. Android Q ही पुढील आवृत्ती असून प्रायव्हसी, सुरक्षितता, डिजिटल वेलबीइंग आणि नावीन्य यांच्यावर गूगलचा भर असेल असं सांगण्यात आलं आहे. काल दिलेल्या माहितीनुसार अँड्रॉइड ओएस आता तब्बल २५० कोटी अॅक्टिव डिव्हाईसेसवर इंस्टॉल करण्यात आलेली आहे!

Android Q मध्ये नवीन तंत्रज्ञानाला पूर्ण सपोर्ट देण्याचा गूगलचा प्रयत्न आहे. 5G, घडी घालता येणारे फोन्स/उपकरणे, मोठे एज टू एज डिस्प्ले, ऑन डिव्हाईस AI, इ. तंत्रज्ञानाला अँड्रॉइड क्यू आधीपासूनच सपोर्ट देईल! गूगलचा हा अँड्रॉइड क्यू प्रीव्यू १२ कंपन्यांच्या फोन्सवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. Huawei, Xiaomi, Nokia, Sony, Vivo, OPPO, OnePlus, ASUS, LGE, TECNO, Essential व realme यांच्या सर्वात नव्या फोन्सवर हा प्रीव्यू उपलब्ध झाला आहे.

अँड्रॉइड क्यूमध्ये नव्याने जोडण्यात आलेल्या सोयी

लाईव्ह कॅप्शन : ही नवी सोय आपल्याला अनेक दृष्टीने उपयोगी पडू शकेल. या सोयीद्वारे फोनमध्ये बोलले जात असलेल्या कोणत्याही ऑडिओचे मजकुरात रूपांतर करून ते डिस्प्लेवर दाखवलं जाईल! उदाहरणार्थ आता आपण यूट्यूबवर जे कॅप्शन वापरतो तेच आता संपूर्ण फोनमध्ये कुठेही वापरता येईल. यामुळे आपण आवाज न होता/ऐकता मजकूर वाचून व्हिडिओ/ऑडिओ पाहू शकू!
डार्क थीम : अनेक वर्षापासून सुरू असलेली मागणी गूगलने एकदाची पूर्ण केली असून आता अँड्रॉईडमध्ये स्वतःची डार्क थीम उपलब्ध असेल! यामुळे ओएलईडी फोन्सची बॅटरीसुद्धा वाचेल असं गूगलने सांगितलं आहे!
Digital wellbeing : याद्वारे आपण दिवसभरात आपल्या फोनवर कोणते अॅप्स किती वेळ वापरले यावर नियंत्रण ठेऊ शकू… यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून फोन वापरण्यात वाया जाणारा वेळ वाचवून यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी करता येईल व कामावर अधिक लक्ष केंद्रीत करता येईल!
फोकस मोड : यामुळे आपल्याला काम / अभ्यास करताना ठराविक अॅप्स बंद ठेवता येतील जेणेकरून त्या अॅप्स कडे आपण जाणार नाही. जोवर आपण फोकस मोड मधून बाहेर पडणार नाही तोवर ते अॅप्स बंदच राहतील! ही सोय Android 9 Pie वर सुद्धा उपलब्ध होणार आहे. Suggested actions in notifications : यामुळे नोटिफिकेशन्सचा अभ्यास करून कोणती क्रिया करायची याबद्दल पर्याय आपल्याला आपोआप सुचवले जातील!
स्क्रीन कंट्युनीटी : यामुळे आता लवकरच मोठ्या प्रमाणात येणार्‍या घडी घालता येणार्‍या फोन्ससाठी चांगली सोय होईल. घडी घातलेल्या अवस्थेत जर आपण एखादी गेम खेळत असू तर घडी उघडून मोठ्या स्क्रिनवर लगेचच गेम सुरू ठेवता येईल कोणताही अधिक वेळ न जाता व्हिडिओ लिंक : https://youtu.be/4dIULf4ma_I
5G नेटवर्क : आता काही देशात उपलब्ध होत असलेल्या 5G ला गूगलने आधीच सपोर्ट देण्याची तयारी सुरू केली असून Android Q मध्ये याबद्दल सर्व पर्याय उपलब्ध असतील!

Exit mobile version