अॅमेझॉनचं भारतातलं सर्वात मोठं डिलिव्हरी स्टेशन पुण्यात सुरू!

अॅमेझॉन इंडियाने काल दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अॅमेझॉनचं भारतातलं सर्वात मोठी डिलिव्हरी स्टेशन कालपासून सुरू केलं आहे. महाराष्ट्रात या प्रकारे त्यांचं डिलिव्हरी नेटवर्क आणखी मोठं करत स्वतःची २०० आणि भागीदारीत ७०० डिलिव्हरी स्टेशन्स उभारली आहेत.

पुण्यातलं डिलिव्हरी स्टेशन हे ४०००० स्क्वे. फुट जागेवर उभारण्यात आलं आहे. यामुळे अॅमेझॉनला पुण्याच्या आजूबाजूला तसेच महाराष्ट्रात वस्तू आणखी वेगात डिलिव्हर करता येतील.

इकॉनॉमिक टाइम्सला प्रकाश रोचलानी (संचालक, लास्ट माइल ट्रान्सपोर्टेशन) यांनी दिलेल्या माहितीनुसार अॅमेझॉन ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांचं डिलिव्हरी नेटवर्क आणखी वाढवत नेईल. I have space या उपक्रमांतर्गत स्थानिक दुकानदारांसोबत भागीदारी करण्यासाठी गुंतवणूक करत असून ३५० शहरात २००० हून अधिक भागीदार यामध्ये सामील झाले आहेत.

महाराष्ट्रात अॅमेझॉन ९०० पिनकोड्सवर त्यांच्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटद्वारे वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून देत आहे. यापुढे ते लोणार, शेगाव, तुळजापूर अशा लहान शहरांमध्येसुद्धा डिलिव्हरी सुरू करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात जगात आघाडीवर असणाऱ्या अॅमेझॉनने त्यांचा अमेरिकेबाहेरील पहिला कॅम्पस सुरू केला आहे. हा जगातला आजवरचा सर्वात मोठा कॅम्पस ठरला आहे! अॅमेझॉनच्या भारतातील एकूण ६२००० कर्मचाऱ्यांपैकी १५००० कर्मचारी या एक ठिकाणी काम करतील! हा कॅम्पस हैदराबादमधील नानाक्रामगुडा येथे ९.५ एकर एव्हढया विस्तीर्ण जागेत पसरला आहे!

“गेल्या पंधरा वर्षात आम्ही भारतात मोठी गुंतवणूक केली असून ३० ऑफिस, १३ राज्यात ५० फुलफीलमेंट सेंटर्स सोबत शेकडो डिलिव्हरी व सॉर्टिंग सेंटर्स उभारली असून यामुळे २००००० नोकऱ्या तयार झाल्या आहेत.” अशी माहिती अॅमेझॉनचे भारतातील मॅनेजर अमित अगरवाल यांनी त्या हैदराबाद कॅम्पस उद्घाटनावेळी दिली होती.

Exit mobile version