एसर व एसुस यांचे जगात प्रथमच 300Hz डिस्प्ले असलेले लॅपटॉप!

काल बर्लिन (जर्मनी) येथे सुरू असलेल्या IFA 2019 कार्यक्रमात आधी एसरने व नंतर एसुसने चक्क 300Hz डिस्प्ले असलेले लॅपटॉप्स सादर केले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही कंपन्यांनी आम्हीच सर्वात आधी असा लॅपटॉप आणत असल्याचा दावा त्यांच्या त्यांच्या कार्यक्रमात केला! एसरने सर्वात आधी जाहीर केला असला तरी त्यांच्याकडे दाखवण्यासाठी हा लॅपटॉप तयार नाहीय तर एसुसने त्यांचा लॅपटॉप प्रोटोटाइपसुद्धा उपलब्ध करून दिला आहे! गेमिंग विश्वात या लॅपटॉप्समुळे नवा अनुभव येण्यास सुरूवात होऊ शकेल. गेल्या काही वर्षात गेमर्सकडून अधिक रिफ्रेश रेटला दिलं जाणारं प्राधान्य लक्षात घेऊन अशी उत्पादने सादर करण्यात येत आहेत.

रिफ्रेश रेट (refresh rate) म्हणजे काय ? : कम्प्युटर मॉनिटर / टीव्ही स्क्रीन ज्या वेगात इमेज रिफ्रेश करते किंवा बदलते तो त्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट. हा हर्ट्झमध्ये मोजला जातो. आपण नेहमी वापरतो ते डिस्प्ले आता शक्यतो 60Hz डिस्प्ले असतात. यापुढे 75Hz, 144Hz, 240Hz पर्यंतसुद्धा डिस्प्ले/मॉनिटर आता बाजारात उपलब्ध झालेले आहेत. रिफ्रेश रेट जितका जास्त तितक्या वेगात स्क्रीन अपडेट होत असल्यामुळे डोळ्याना दृश्य सहज दिसतं. वनप्लसच्या OnePlus 7 Pro मध्ये 90Hz डिस्प्ले असून यामुळे स्क्रोल करताना नवीन अनुभव मिळत असल्याच मत अनेकांनी नोंदवलं आहे. एसुसने तर यापुढे जाऊन त्यांच्या गेमिंग फोन्समध्ये 120Hz डिस्प्ले दिला आहे!

एसुसच्या लॅपटॉपचं नाव Asus ROG Zephryus S GX7001 असं असणार असून याचा डिस्प्ले १७ इंची 300Hz रिफ्रेश रेट असलेला आहे. यामध्ये Nvidia GeForce RTX 2080 हे सध्याचं पॉवरफुल ग्राफिक्स कार्ड जोडलेलं असून 9th Gen Intel Core i7 प्रोसेसर आहे! हा लॅपटॉप ऑक्टोबर महिन्यात उपलब्ध होणार आहे. लॅपटॉपच्या डिझाईनमध्ये विविध RGB लाइट लोगोचा समावेश असून Aura Sync द्वारे नियंत्रित करता येईल.

या कार्यक्रमात एसुसने इतरही बरीच उत्पादने सादर केली असून यामध्ये प्रो डिस्प्ले, मॉनिटर, लॅपटॉप्सचा समावेश आहे. ProArt Display PA32UCG, ProArt Display PA32UCG

एसरच्या Acer Predator Triton 500 लॅपटॉपमध्ये सुद्धा 300Hz डिस्प्ले असून शक्यतो दोन्ही लॅपटॉप्समधील पॅनल सारखाच आहे. या लॅपटॉपमध्ये 9th Gen Intel Core i7-9750H हा प्रोसेसर आणि Nvidia GeForce RTX 2080 with the Max-Q design ग्राफिक्स कार्ड जोडेलेलं आहे. यामध्ये 32GB रॅम आणि दोन 512GB NVMe PCIe 3.0 x4 SSD दिलेल्या आहेत. यासोबत या लॅपटॉपमध्ये डिस्प्लेला 3 ms response time असून Nvidia’s G-Sync सपोर्ट आहे. डिस्प्ले 15.6-inch 1920 x 1080 pixels रेजोल्यूशन असलेला आणि screen-to-body ratio ८१% आहे. एसरच्या लॅपटॉपची किंमत $2,800 असणार आहे डिसेंबर दरम्यान उपलब्ध होत आहे.

Exit mobile version