गूगल फॉर इंडिया : गूगल लेन्स, असिस्टंट, बोलो अॅप आता मराठीत!

गूगल फॉर इंडिया हा कार्यक्रम गूगलचे भारतीय वापरकर्त्यांसाठी सुरु असलेले प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी आयोजित केला जातो. Google For India मध्ये यंदाच्या पाचव्या वर्षीही बऱ्याच नव्या गोष्टी आणल्या असून मराठी भाषेतही अनेक सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गूगलने बेंगळुरूमध्ये AI Lab स्थापन केली असून कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अभ्यास करून त्याद्वारे देशातील दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी पर्याय शोधण्याचं काम करणार आहे. लॅब सुरु करत असल्याचं जाहीर केलं आहे. आजच्या या लेखामध्ये काही विशेष उत्पादनांविषयी माहिती देण्यात आली आहे त्यांची ओळख करून घेऊया…

गूगल लेन्स (Google Lens) : या खास सुविधेद्वारे आपण आपल्या फोनच्या कॅमेराचा वापर करून बऱ्याच गोष्टी करू शकतो जसे की भाषांतर, वस्तु/प्रेक्षणीय स्थळे/फुले/पदार्थ ओळखणे. फोटो काढून त्यामधील टेक्स्ट स्कॅन करून त्याची माहिती सांगणे किंवा सर्च करणे, इ. तर आता ही गूगल लेन्स सुविधा मराठीत सुद्धा उपलब्ध होत असून यामुळे तुम्ही तुमचा फोन तुम्हाला माहीत नसलेल्या भाषेतला फलक/जाहिरातीकडे करून स्कॅन केल्यास तो मराठीत भाषांतर करून दाखवेल!

बोलो (Bolo) : हे अॅप लहान मुलांना भाषा शिकवण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने बनवण्यात आलं असून याद्वारे वाचन, उच्चार सुधारणे हा उद्देश असेल. हिंदी व इंग्लिशमध्ये सादर झालेलं हे अॅप आता मराठीत सुद्धा उपलब्ध झालं आहे. सोबत बंगाली, तामिळ, तेलुगू, उर्दूमध्येसुद्धा हे उपलब्ध होत आहे. यामध्ये वेगवेगळ्या कथा, गोष्टींचा सुद्धा समावेश आहे! आजवर ८ लाख मुलांनी याचा लाभ घेतला आहे अशी माहिती गूगलने दिलीय!

गूगल असिस्टंट (Google Assistant) : या स्मार्ट व्हॉइस असिस्टंटमध्ये आता अनेक नव्या सोयी खास भारतीय यूजर्ससाठी जोडण्यात येत आहेत. गेल्या वर्षीच हा असिस्टंट मराठीत उपलब्ध झाला आहे. यावेळी असं जाहीर करण्यात आलं आहे कि भारतीय यूजर्समध्ये गूगल असिस्टंटचा वापर करण्याचं प्रमाण वाढत असून याचा सर्वाधिक वापर करण्यात हिंदी आता इंग्लिशनंतर जगातली दुसरी भाषा ठरली आहे.

आता गूगल असिस्टंटला वेगळी भाषा आणि फोनसाठी वेगळी भाषा निवडता येईल. सर्च करताना गूगल असिस्टंटला ओके गूगल स्पीक टू मी इन मराठी असं सांगा त्यापुढे असिस्टंट तुमच्याशी मराठीत बोलेल!

गूगल असिस्टंट आता इंटरनेटशिवायसुद्धा वापरता येणार असून ही सुविधा तूर्तास व्होडाफोन आयडिया ग्राहकांसाठीच आहे. यासाठी तुम्हाला 8009191000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून प्रश्न विचारून गूगलकडून उत्तरे मिळवता येतील! क्रिकेट स्कोर विचारा, हवामान विचारा, अगदी काहीही…!

लवकरच गूगल असिस्टंटला बोलून आपल्याला डॉमिनोजचा पिझ्झा मागवता येईल, ओलाद्वारे कॅब बुक करता येईल!

गूगल सर्च डिस्कव्हर (Google Search Discover) : आपण गूगल सर्चमध्ये असताना डावीकडे स्वाईप केल्यावर आपल्याला आपण सर्च केलेल्या गोष्टींवर आधारित लेख पाहायला मिळतात. यासाठी गूगल Discover या सेवेचा वापर करतं आता ही मराठीतसुद्धा उपलब्ध होत आहे. यामुळे यापुढे तुम्हाला केवळ इंग्लिश कंटेंट ऐवजी मराठी बातम्या, लेख पाहायला मिळतील.

गूगल पे (Google Pay) : गूगल पे या गूगलच्ये पेमेंट सेवेमध्ये त्यांनी अनेक नव्या सोयी जाहीर केल्या आहेत. गेल्या वर्षभरात गूगल पेच्या यूजर्समध्ये तिप्पट वाढ झाली आहे. वार्षिक 110 बिलियन डॉलर्सचे व्यवहार आता या अॅपद्वारे पार पडत आहेत.

Google Pay Jobs

search terms Google For India Google Assistant Now in Marathi Discover Google Pay India Small Businesses Google Pay Jobs Search Spot Platform Bolo Google Lens

Exit mobile version