शायोमी Mi टीव्ही, वॉटर प्युरीफायर, Mi Band 4, स्मार्ट लॅंप भारतात सादर!

शायोमीने आज बेंगळुरूमध्ये झालेल्या शायोमी स्मार्टर लिव्हिंग इव्हेंट या कार्यक्रमात तीन नवी स्मार्ट उपकरणे सादर केली असून शिवाय त्यांच्या Mi TV मालिकेत नवे आकार उपलब्ध करून दिले आहेत. मी वॉटर प्युरीफायर, अनेक जण वाट पाहत असलेला Mi Band 4 सुद्धा यावेळी सादर झाला आहे. कंपनीने यावेळी गेल्या पाच वर्षात दहा कोटी फोन्स विकले गेले असल्याचं सांगितलं!

Mi TV 4X मालिकेत नवे टीव्ही : ४३ इंची, ५० इंची व ६५ इंची 4K HDR10 10 bit panel असलेले टीव्ही सादर करण्यात आले आहेत. ६५ इंची टीव्ही शायोमीचा आजवरचा सर्वात मोठा टीव्ही आहे. Vivid Picture Engine ही इमेज प्रोसेसिंग इंजिन जोडण्यात आलं आहे. ऑडिओसाठी 20W डॉल्बी सपोर्ट देण्यात आला आहे. Android TV + Google Assistant, 64 bit Quad-core, 2GB रॅम + 16GB स्टोरेज अशा सुविधांची जोड देण्यात आली आहे. नवा रिमोट देण्यात येत आहे जो स्मार्ट सुविधांनी युक्त असेल. यावर गूगल असिस्टंट, नेटफ्लिक्स व अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसाठी खास बटन आहे.

Mi TV 4X ६५ इंची 4K टीव्हीची किंमत ५४९९९, ५० इंची टीव्हीची किंमत २९९९९, ४३ इंची टीव्हीची किंमत २४९९९ असणार आहे आणि हे टीव्ही २९ सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट व mi.com वर उपलब्ध होईल. Mi TV 4A ४० इंची FHD टीव्हीची किंमत १७९९९ असणार आहे. शिवाय शायोमीच्या नव्या काळ्या रंगात उपलब्ध होत असलेल्या साऊंडबारची किंमत ४९९९ असेल.

Mi Band 4 : गेले अनेक दिवस ग्राहक या स्मार्ट फिटनेस बॅंडची वाट पाहत होते आणि आज शेवटी हा भारतात सादर झाला आहे. यामध्ये 0.95 इंची AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो यूजरची सर्व शारीरिक हालचाल आणि त्यासंबंधी माहिती दर्शवेल. सोबत कॉल्स, मेसेजससंबंधी नोटिफिकेशन्ससुद्धा पाहता येतील. यामध्ये व्हॉईस कमांड्ससुद्धा देता येतील. एका चार्जवर हा वीस दिवस चालेल. six-axis accelerometer, 24×7 heart rate monitoring, 50 metres water-resistance, Music and volume controls, Swim tracking with stroke recognition अशा सुविधा जोडण्यात आल्या आहेत. याची किंमत २२९९ असणार आहे. हा बॅंड १९ सप्टेंबरपासून Amazon, mi.com वर मिळेल.

Mi Smart Water Purifier : मिनीमलिस्ट डिझाईन असलेला हा वॉटर प्युरीफायर शायोमीच्या स्मार्ट होम उपकरणांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. फक्त दोन बटन्स असून ७ लीटर पाण्याची टाकी आहे. यामध्ये ५ स्तरांवर शुद्धीकरण केलं जाईल. RO+UV द्वारे सुरक्षा शुद्धीकरण केलं जाईल. TDS साठी दोन सेन्सर्स असतील. यामुळे TDS लेवल Mi Home App मध्ये फोनवर पाहायला येईल! याचा फिल्टर कोणालाही सहज बदलता येईल. याची किंमत ११९९९ असून २९ सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट व mi.com आणि Mi Home Stores मध्ये मिळेल

Mi Motion Activated Night Light 2 : हे नवीन उत्पादन भारतात प्रथमच सादर करण्यात आलं असून असून हे क्राऊडफंडिंगद्वारे विकलं जाणार आहे. हा जय खोलीमध्ये लावला असेल त्यामध्ये हालचाल झाली की सेन्सर काम करतो आणि हा नाइट लॅंप प्रकाशतो! यामध्ये २ ब्राईटनेस लेव्हल्स देण्यात आल्या आहेत. याची किंमत crowdfunding अंतर्गत रु ५०० असेल

Exit mobile version