गूगल न्यूजवर आता एकाचवेळी दोन भाषांमध्ये बातम्या वाचता येणार!

गूगल न्यूज ही गूगलची अशी सेवा आहे जी जगातल्या प्रमुख न्यूज चॅनल्स, वृत्तपत्रे यांच्या वेबसाइट्सवरून बातम्या गोळा करून एका जागी दाखवते. आजवर या सेवेत एकावेळी एकाच भाषेतील स्त्रोत वापरुन बातम्या वाचता यायच्या मात्र काल जाहीर केलेल्या नव्या सोयीनुसार आपल्याला गूगल न्यूजमध्ये दोन भाषांचा वापर करता येणार आहे. उदा. तुम्ही आता इंग्लिश भाषेत बातम्या वाचत असाल आणि तुम्ही आता सेटिंग्स मधून मराठी भाषा जोडली तर इंग्लिश सोबत मराठी बातम्यांचे सोर्स दिसायला लागतील!

गूगल न्यूजच हे अपडेट अँड्रॉइड व iOS दोन्हीवर उपलब्ध झालेलं आहे. गूगल न्यूज मराठीसह एकूण ४१ भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि १४१ देशांमधील स्त्रोत इथे पाहायला मिळतात! मराठीत ही सेवा काही महिन्यांपूर्वीच उपलब्ध झाली असून ABP माझा, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, दिव्य मराठी, झी २४ तास, TV9 मराठी, News18 लोकमत असे अनेक मराठी स्त्रोत दिसत आहेत. सध्यातरी दोनच भाषा गूगल न्यूज मध्ये जोडता येतील.

या GIF मध्ये दाखवल्याप्रमाणे मराठी भाषासुद्धा अॅड करू शकता.

अधिकृत माहिती : https://www.blog.google/products/news/news-multiple-languages/

Exit mobile version