मोटोरोला रेझरचं (Razr) पुनरागमन : जुन्या फोनला आता नवं रूप!

गेली अनेक महीने चर्चा सुरू असलेला फोन आज सादर झाला असून हा फोन २००४ साली आलेल्या मोटोरोला रेझर या प्रचंड लोकप्रिय फोनची नवी आवृत्ती असेल. नव्या फोनमध्ये घडी घालता येणारा डिस्प्ले असून या फोनची डिस्प्लेसह घडी घालता येईल! शिवाय समोर याला एक छोटा डिस्प्लेसुद्धा देण्यात आला आहे. हा दूसरा डिस्प्ले नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी, गाणी नियंत्रित करण्यासाठी, गूगल असिस्टंटसाठी उपयोगी पडेल. छोट्या डिस्प्ले मध्ये पाहत असलेली गोष्ट मोठ्या डिस्प्ले उघडून पाहिल्यास आपोआप मोठ्या डिस्प्लेला साजेशा आकारात दिसेल!

या फोनमध्ये Snapdragon 710 हा प्रोसेसर, 2510mAh ची बॅटरी, 6GB रॅम, 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे. याच्या जुन्या मॉडेलचं वैशिष्ट्य घडी घालून खिशात टाकता येणारा फोन. आता नव्या मॉडेलमध्येही तेच करता येईल मात्र घडी उघडल्यावर आपल्याला पूर्ण फोनच्याजागेत डिस्प्ले पाहायला मिळेल अगदी जो भाग दुमडला जाईल तो भाग सुद्धा डिस्प्लेनेच व्यापलेला आहे.

Motorola razr 2004 Vs razr 2019

Motorola razr Specifications

डिस्प्ले : Main “Flex View”: 6.20-inch OLED 2142×876
डिस्प्ले : Closed “Quick View”: 2.69-inch 800×600
कॅमेरा : Outer: 16MP, f/1.7, 1.22um, EIS, Dual Pixel autofocus (AF), Laser AF
कॅमेरा : Internal: 5MP, f/2.0, 1.12um
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 710
रॅम : 6GB
स्टोरेज : 128GB
बॅटरी : 2510mAh with TurboPower charging
इतर : Capacitive fingerprint scanner embedded in power button, software face unlock, IP Rating: IP68, Bluetooth 5.0
ऑडिओ : Speaker in top bezel, 2 microphones in bottom bezel, no 3.5mm headphone jack
ऑपरेटिंग सिस्टम : Android 9 Pie
रंग : Noir Black
किंमत : ₹1,24,999 हा फोन फ्लिपकार्ट आणि मोटोरोला वेबसाइटवर प्रिऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. याची विक्री 2 एप्रिलपासून सुरू होईल. (Updated 18-03-2020)

https://youtu.be/FC5FcfZf7xw
Exit mobile version