realme X2 Pro सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी!

Realme हा ब्रॅंड सध्या भारतीय स्मार्टफोन बाजारात सर्वाधिक वेगाने वाढत असून यांचे विविध किंमतीमध्ये उपलब्ध असलेले फोन्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. ओप्पोचा सबब्रॅंड म्हणून सुरुवात केलेल्या रियलमीने आता स्वतःची ओळख निर्माण केली आहे! Realme X2 Pro हा त्यांचा नवा फ्लॅगशिप फोन असून सर्वोत्तम फीचर्सचा समावेश करून किंमतही कमी ठेवण्यात रियलमीने यश मिळवलं आहे. या फोनमध्ये सर्वात वेगवान 50W फास्ट चार्जिंग, 90Hz डिस्प्ले, चार कॅमेरे ज्यातला एक 64MP आहे, अँड्रॉइडसाठी सर्वात वेगवान Snapdragon 855+ प्रोसेसर हे सगळं देऊन किंमत २९९९९ आहे! Vapor Cooling द्वारे फोन गरम होणार नाही याची काळजी घेतली जाईल. अगदी रेडमी K20 Pro आणि वनप्लस 7T ला मागे टाकू शकेल असा पर्याय रियलमीने उपलब्ध करून दिला आहे.

Realme X2 Pro या फोनची भारतीय किंमत २९९९९ (8GB+128GB) आहे शिवाय आणखी रॅम आणि स्टोरेज पर्याय सुद्धा देण्यात आला असून त्याची किंमत ३३९९९ (12GB+256GB) असेल. Realme X2 Pro Master Edition मॉडेल जे Naoto Fukasawa यांनी डिझाईन केलं आहे ते सुद्धा भारतात सादर झालं असून याची किंमत ३४९९९ असेल.या मॉडेलला रेड ब्रिक आणि कॉँक्रिट फिनिश देण्यात आला आहे. X2 Pro भारतात फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या ऑनलाइन स्टोअरवर २६ नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल.

लॉंच ऑफर्ससुद्धा उपलब्ध झाल्या असून नो कॉस्ट ईएमआय सोबत जिओच्या कनेक्शनवर ११५०० रुपये किंमतीचे फायदे मिळतील. (रीचार्ज, कुपन्स, सेवा, इ). पहिल्या सेलमध्ये फोन घेणाऱ्याना Realme Buds Wireless मोफत मिळणार आहेत! मात्र पहिला सेल invite only असेल.

realme 2 Pro

डिस्प्ले : 6.5-inch dew-drop fullscreen Super AMOLED 90Hz HDR10+
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 855+
GPU : Adreno 640
रॅम : 8GB/12GB
स्टोरेज : 128GB/256GB UFS 3.0 ROM
कॅमेरा : 64MP Quad Camera with 20x Hybrid Zoom + 13MP Tele + 8MP Wide angle + 2MP Portrait lens
फ्रंट कॅमेरा : 16MP f/2.0 with EIS f/2.0 Sony IMX471
बॅटरी : 4000mah 50W SuperVOOC Flash Charge (10V, 5A in box)
ऑपरेटिंग सिस्टिम : ColorOS 6.1 customized by realme
इतर : 2×2 MIMO, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 5.0, Type-C, 3.5mm headset, Dual Stereo Speakers With Dolby Atmos
सेन्सर्स : Multifunctional NFC, GPS/Beidou/Galileo (Dual-frequency GPS), Light sensor, Proximity sensor, Magnetic induction sensor, Gyro-meter, Acceleration sensor, In-display fingerprint scanner, Goodix’s new generation In-Display Scanner, Unlocks in 0.23 Seconds
रंग : Lunar White, Neptune Blue
किंमत :
8GB+128GB ₹२९९९९
12GB+256GB ₹३३९९९

याचवेळी रियलमी आणखी एक फोन सादर केला असून realme 5s हा एक बजेट स्मार्टफोन असून किंमतीच्या मानाने यामध्येही बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. 6.5″ डिस्प्ले, Snapdragon 665 प्रोसेसर, 48MP मुख्य कॅमेरा, एकूण चार कॅमेरे, 5000mAh बॅटरी, 4GB रॅम अशा सुविधा ९९९९ (4GB+64GB) आणि १०९९९ (4GB+128GB) या किंमतीत मिळेल. हा फोन २९ नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल!

Exit mobile version