शायोमीचं स्मार्ट घडयाळ Mi Watch सादर!

शायोमीने त्यांच्या विविध उपकरणांमध्ये आता आणखी एका प्रकारचं उत्पादन जोडत Xiaomi Mi Watch सादर केलं आहे. कालच यावेळी त्यांनी पाच कॅमेरे असलेला Mi CC9 Pro स्मार्टफोन सादर केला आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा चक्क 108MP चा आहे! मी वॉच सरळ सरळ अॅपल वॉच प्रमाणेच दिसत अनेकांनी थेट कॉपी असल्याचं मत मांडलं आहे. मात्र शायोमी मी वॉचची किंमत अॅपल वॉचच्या निम्म्याहून कमी आहे! Mi Watch ची किंमत CNY 1299 (~१३५००) आहे. शायोमी हे घड्याळ तुमच्या हातात छोटा फोन असल्याप्रमाणे असेल असं म्हणत आहे.

या घड्याळामध्ये 1.78″ AMOLED डिस्प्ले, Always On Screen, 4G eSIM सपोर्ट, सिममुळे घड्याळामधूनच कॉल्स करण्याची सोय, 100+ अधिक वॉच फेसेस, WiFi, Bluetooth अशा जवळपास सर्व शक्य सोयी दिलेल्या आहेत.

या घड्याळाला सिरॅमीक बॅक असून अॅल्युमिनियम अॅलॉय फ्रेम आहे. अॅपल प्रमाणेच यामध्येही बटन आणि Crown (फिरवता येईल असं बटन) दिलेलं आहे. या दोन्हीच्या मध्ये एक मायक्रोफोन आहे. घड्याळाच्या डावीकडे एक स्पीकर आहे. यामधून कॉल्ससाठी आवाज, गाणी ऐकता येतील!

मी वॉचमध्ये Qualcomm Snapdragon 3100 चिपसेट दिलेला असून हा एक क्वाड कोर प्रोसेसर आहे. या घड्याळामध्ये अँड्रॉइडच्या वियरेबल्स साठी असणाऱ्या WearOS आधारित MIUI For Watch जोडलेली आहे. यामुळे यात ४० हून अधिक अॅप्स दिलेली पाहायला मिळतील. MIUI चे बऱ्यापैकी लोकप्रिय असलेले अॅप्स जसे की Tasks, Recorder, Mi Home, Notes यामध्ये खास बनवण्यात आले आहेत. शिवाय याच्या अॅप स्टोअरमधून आणखी अॅप्स घेता येतीलच

याची बॅटरी लाईफ ३६ तासांची असेल असं शायोमीने सांगितलं आहे. 570mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सोबत 1GB रॅम आणि 8GB स्टोरेज दिलेलं आहे. यामध्ये दहा शारीरिक क्रिया आपल्याला ट्रॅक करता येतील जसे की चालणे, पळणे, पोहणे, ट्रेकिंग इत्यादी. शिवाय हार्ट रेट मॉनिटरिंग आहेच. यामधील Firstbeat द्वारे हार्ट रेट आणि व्यायामाचा वेग तपासून आणखी सोपं समजेल असं ट्रॅकिंग केलं जाईल.

हे घडयाळ भारतात कधी उपलब्ध होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही. चीनमध्ये ११ नोव्हेंबरपासून विक्रीस उपलब्ध होत आहे.

लवकरच वनप्लससुद्धा स्वतःचं स्मार्ट घड्याळ आणणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

https://youtu.be/5YjUt0NdAOE
Exit mobile version