ॲपलने काल रात्री झालेल्या Glowtime कार्यक्रमात त्यांची नवी आयफोन १६ मालिका सादर केली असून यामध्ये iPhone 16, 16 Plus, 16 Pro आणि 16 Pro Max चा समावेश आहे. या सर्व फोन्समध्ये आता त्यांची नवी A18 Pro चिप असणार आहे आणि त्याला Apple Intelligence द्वारे AI ची जोड देण्यात आली आहे. नव्या प्रो फोन्समध्ये थोडेसे मोठे डिस्प्ले, सर्वाधिक बॅटरी लाईफ, कॅमेरासाठी स्वतंत्र बटन, नवा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे.
iPhone 16 आणि 16 Plus मध्ये A18 चिप, USB C पोर्ट (जे गेल्यावेळी फक्त प्रो फोन्समध्येच होतं), Dynamic Island, Spatial Photos & Video, नवं कॅमेरा कंट्रोल बटन, स्विच ऐवजी नवं ॲक्शन बटन, नवा अल्ट्रा वाईड कॅमेरा मिळेल! याची किंमत भारतात ७९९०० पासून सुरू होईल. यामधील नव्या A18 चिपमध्ये second-gen 3nm technology आणि 6-core CPU, 5-core GPU, 16-core Neural Engine चा समावेश आहे! अॅपलने प्रथमच 16 आणि 16 Plus मध्ये आता 6GB ऐवजी 8GB रॅम देण्यास सुरूवात केली आहे!
iPhone 16 Pro आणि 16 Pro Max मध्ये A18 Pro चिप, 4K 120fps Video Recording, Spatial Photos & Video, नवं कॅमेरा कंट्रोल बटन, USB 3 असलेलं USB C पोर्ट, Pro Max chi 6.9″ स्क्रीन, Wifi 7, नवा अल्ट्रा वाईड कॅमेरा, चार नवे रंग मिळतील! याची किंमत भारतात १,१९,९०० पासून सुरू होईल. यामधील नव्या A18 चिपमध्ये second-generation 3nm chip, 6-core CPU, 6-core GPU, 16-core Neural Engine चा समावेश आहे!
यासोबत Apple Watch Series 10 सादर करण्यात आलं असून यामध्ये आता Sleep Apnea चंसुद्धा नोटिफिकेशन मिळणार आहे. Apple Watch Ultra 2 आता नव्या Black Titanium रंगात उपलब्ध झाला आहे.
Apple AirPods4 मध्ये आता ANC ( Active Noise Cancellation), नवी H2 चिप, नवे सिरी Interactions, USB C चार्जिंग मिळणार आहे.
Apple AirPods Pro 2 आता अधिकृतरित्या Hearing Aids म्हणूनसुद्धा वापरता येणार आहेत. तुमचा Audiogram अपलोड करून त्याला ट्यून करता येईल!
भारतीय किंमती खालील प्रमाणे (Apple iPhone 16 Indian Pricing)
- Apple iPhone 16 : ₹79,900
- Apple iPhone 16 Plus : ₹89,900
- Apple iPhone 16 Pro : ₹1,19,900
- Apple iPhone 16 Pro Max : ₹1,44,900
- Apple Watch Series 10 : ₹46,900
- Apple Watch Ultra 2 : ₹89,900
- Apple Airpods 4 : ₹12,900
- Apple AirPods Pro 2 : ₹24,900
- Apple AirPods Max : ₹59,900
पूर्ण कार्यक्रमाचा सारांश सांगणारा हा व्हिडिओ पहा.