मायक्रोसॉफ्टचं नवं ऑफिस अॅप आता अँड्रॉइड व iOS वर उपलब्ध!

वर्ड, पॉवरपॉईंट, एक्सेल सर्वकाही एकाच ठिकाणी

Microsoft Office Mobile

मायक्रोसॉफ्टने त्यांच्या प्रसिद्ध वर्ड, पॉवरपॉइंट आणि एक्सेल या सेवांना एकत्र आणून Office Mobile नावाचं अॅप सादर केलं असून हे आता अँड्रॉइड व iOS वर मोफत उपलब्ध झालं आहे! या अॅपची चाचणी गेले काही महिने सुरु होती. आधी मायक्रोसॉफ्टने या सेवांचे अॅप्स स्वतंत्र ठेवले होते त्यामुळे तिन्ही अॅप्स डाउनलोड लागत होती. नव्या ऑफिस मोबाइलमध्ये क्विक अॅक्शन सारख्या पर्यायामुळे कुठेही ऑफिस संबंधित काम लवकर पार पाडता येईल!

सर्व प्रमुख अॅप्स एकत्र आल्याने तुम्ही एका प्रकारच्या डॉक्युमेंटवर काम करता करता दुसऱ्या प्रकारच्या डॉक्युमेंटचही काम सुरु करू शकाल. उदा स्कॅन करणे, व्हाईटबोर्डवरील माहिती टिपणे आणि त्यांचं एडिट करता येईल अशा माहितीत रूपांतर करणे नंतर त्या फाइल्स क्लाऊडवर अपलोड करणे अशी कामे सहज करता येतात.

या अॅपचा उद्देश लवकरात लवकर काम पार पडावं असाच आहे. टेम्प्लेट तयार करणे, टेबल स्कॅन करून त्यातील माहिती मिळवणे किंवा नेहमीप्रमाणे फक्त फाइल्स उघडून पाहणेसुद्धा सहजशक्य आहे. वर्ड डिक्टेशन सोय सुद्धा देण्यात आली असून आपण बोलू त्याप्रमाणे टाईप करता येईल!

नव्या कार्ड व्ह्यूमुळे एक्सेल वापरणं सोपं होईल कारण बऱ्याचदा फोनवर एक्सेल वापरत असताना टेबलमध्ये खूप पुढील कॉलम किंवा रो पाहत असताना नक्की कोणत्या क्रमांकावर आलो आहोत याची माहिती नकळत चुकते. मात्र कार्ड व्ह्यू मध्ये मोबाइलला साजेश्या आकारात माहिती पुरवली जाईल.
अजूनही जर कुणाला स्वतंत्र अॅप हवं असेल तर त्यांच्यासाठी स्वतंत्र अॅप्स उपलब्ध असतीलच अशी माहिती देण्यात आली आहे.

Download Office Mobile from Google Play : apps.apple.com/app/id541164041
Download Office Mobile from App Store : play.google.com/store/apps/details?id=com.microsoft.office.officehubrow

Office Mobile Intro : The new Office mobile app—designed to be your go-to app for getting work done on a mobile device—is now available for anyone to download on Android and iOS. The Office app combines the Word, Excel, and PowerPoint apps you know and rely on, with new capabilities that harness the unique strengths of a phone to create a simpler, yet more powerful Office experience on the go.

Exit mobile version