Poco X2 सादर : 120Hz डिस्प्ले, 64MP कॅमेरा तेसुद्धा कमी किंमतीत!

शायोमीचा स्मार्टफोन ब्रॅंड पोको (Poco) तर्फे आज एक नवा स्मार्टफोन सादर करण्यात आला असून मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये आणखी एकदा वादळ आणण्यास पोको सज्ज झाली आहे. हा ब्रॅंड २०१८ मध्ये सुरू करण्यात आला होता त्यावेळी सादर झालेला Pocophone F1 खूपच चर्चेत आला होता आणि त्याची मोठ्या प्रमाणात विक्रीसुद्धा झालेली आहे. फ्लॅगशिप म्हणजे त्या वेळचा सर्वोत्तम मोबाइल प्रोसेसर मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये देऊन पोकोफोनने धक्का दिला होता. आता तेच त्यांच्या या नव्या Poco X2 मध्ये करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. Poco X2 मध्ये 120Hz डिस्प्ले, 64MP कॅमेरा, 4500mAh बॅटरी सोबत 27W फास्ट चार्ज, लिक्विड कुलिंग आणि ही सगळं फक्त १५९९९ रुपयांमध्ये मिळेल!

हा फोन खरेतर तंतोतंत चीनमध्ये उपलब्ध असलेल्या Redmi K30 सारखा आहे. गेले अनेक दिवस थंड झालेल्या पोको ब्रॅंडला शायोमीचा सबब्रॅंड न ठेवता यापुढे स्वतंत्र फोन्स सादर केले जातील. Redmi K30 रिब्रॅंड करून भारतात आणल्यामुळे हा फोन Pocophone F1 ची नवी आवृत्ती म्हणता येत नाही.
हा फोन ११ फेब्रुवारी पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत १५९९९(6GB+64GB), १६९९९ (6GB+128GB) १९९९९(8GB+256GB) अशी असणार आहे.

या फोनची थेट स्पर्धा रियलमीच्या realme X2 सोबत असून पोको स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर तुलनेसाठी त्याच फोनचं उदाहरण घेत आहेत. त्यावर रियलमी कडून त्यांच्या फोनमध्ये 30W फास्ट चार्जर, AMOLED डिस्प्ले, Under Display fingerprint scanner, 32MP फ्रंट कॅमेरा अशा फीचर्सचा उल्लेख करण्यात आला आहे जे Poco X2 मध्ये नाहीत. मात्र realme X2 ची किंमत १ ते २ हजारांनी जास्त आहे.

रिफ्रेश रेट (refresh rate) म्हणजे काय ? : कम्प्युटर मॉनिटर / टीव्ही स्क्रीन ज्या वेगात इमेज रिफ्रेश करते किंवा बदलते तो त्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट. हा हर्ट्झमध्ये मोजला जातो. आपण नेहमी वापरतो ते डिस्प्ले आता शक्यतो 60Hz डिस्प्ले असतात. यापुढे 75Hz, 144Hz, 240Hz पर्यंतसुद्धा डिस्प्ले/मॉनिटर आता बाजारात उपलब्ध झालेले आहेत. रिफ्रेश रेट जितका जास्त तितक्या वेगात स्क्रीन अपडेट होत असल्यामुळे डोळ्याना दृश्य सहज दिसतं. वनप्लसच्या OnePlus 7 Pro, realme X2 सारख्या फोन्समध्ये 90Hz डिस्प्ले असून यामुळे स्क्रोल करताना नवीन अनुभव मिळत असल्याच मत अनेकांनी नोंदवलं आहे. काही गेमिंग फोन्समध्ये याआधी 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे.

Poco X2

डिस्प्ले : 6.67″ FHD+ incell RD Display 2400×1800 20:9 386 PPI HDR 10
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 730G LiquidCool Technology
GPU : Adreno 618
रॅम : 6GB / 8GB LPDDR4X
स्टोरेज : 64GB / 128GB / 256GB storage options (UFS 2.1)
कॅमेरा : 64MP (Sony IMX686 sensor) + 8MP wide-angle + 2MP Portrait + 2MP macro 
फ्रंट कॅमेरा : 20MP + 2MP
बॅटरी : 4500mAh 27W charging power (5V, 2A inbox)
ऑपरेटिंग सिस्टिम : MIUI 11
इतर : 802.11 a/b/g/n/ac Wi-Fi, Bluetooth 5.0, 3.5mm audio port, USB Type C
सेन्सर्स : Proximity sensor, Gyroscope, Accelerometer, Electronic compass, Ambient light sensor, Side mounted fingerprint sensor
रंग : Matrix Purple, Phoenix Red, Atlantis Blue
किंमत : ₹१५९९९(6GB+64GB), ₹१६९९९ (6GB+128GB), ₹१९९९९(8GB+256GB)

Exit mobile version