realme C3 : स्वस्त स्मार्टफोन्समध्ये नवा पर्याय!

सध्या बऱ्याच चर्चेत असलेल्या रियलमीने स्वस्त स्मार्टफोन्समध्ये आता आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला असून आज त्यांनी realme C3 सादर केला आहे. या फोनमध्ये ड्युयल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, HD+ डिस्प्ले. विशेष म्हणजे या फोनद्वारे दुसरा फोन चार्ज करता येईल अर्थात हा फोन पॉवरबँकप्रमाणे सुद्धा काम करतो! Helio G70 असलेला भारतातला हा पहिलाच फोन आहे. गेमिंग सुद्धा करता येईल असं रियलमीने म्हटलं आहे! 12MP चा AI कॅमेरा जो दृश्य ओळखून त्यानुसार फोटो काढेल. स्लो मो व्हिडिओ काढण्याचीही सोय यामध्ये आहे.

अर्थात या फोनमध्ये काही गोष्टी कमी आहेत ज्यामुळे काही जणांनी याच्या किंमतीवर नाराजी व्यक्त केली आहे. जसे की रियलमीचे याआधीच बरेच पर्याय याच किंमतीत आहेत आणि त्यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर सारख्या सोयी असून या नव्या फोनमध्ये त्या दिलेल्या नाहीत. शिवाय 3GB+32GB मॉडेलची किंमत ६९९९ असणे सुद्धा आता स्पर्धेच्या मानाने जास्त वाटते असं मत अनेकांनी नोंदवलं आहे. आता सर्व फोन्स Type C कडे वळत असताना या फोनमध्ये MicroUSB पोर्ट देण्यात आला आहे! अशा गोष्टीमुळे अजूनही realme 5, 5i अधिक चांगले पर्याय ठरतील.
हा फोन १४ फेब्रुवारी पासून realme.com आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

realme C3

डिस्प्ले : 6.5″ mini-drop fullscreen LCD multi-Touch 1600×720
प्रोसेसर : Helio G70 Processor
GPU : Arm Mali-G52 MC2
रॅम : 2GB/3GB/4GB
स्टोरेज : 32GB/64GB + Up to 256GB external memory
कॅमेरा : 12MP AI Dual Camera with 2MP Portrait Lens
फ्रंट कॅमेरा : 5MP
बॅटरी : 5000mAh Supports reverse charging 10W charging power
ऑपरेटिंग सिस्टिम : realme UI 1.0 Based on Android 10
इतर : Wi-Fi 802.11 b/g/n, Bluetooth 5.0, 3.5mm audio port, Corning Gorilla Glass, Micro-USB
सेन्सर्स : GPS/Beidou/Glonass/A-GPS, Light sensor, Proximity sensor, Magnetic induction sensor, Acceleration sensor
रंग : Frozen Blue, Blazing Red
किंमत : ₹६९९९(3GB+32GB), ₹७९९९ (4GB+64GB),

Exit mobile version