सॅमसंग Galaxy A71 स्मार्टफोन व Galaxy Buds Plus भारतात सादर!

सॅमसंगने Galaxy A या लोकप्रिय मालिकेत चार कॅमेरे, उत्तम डिस्प्ले, मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग असलेला Galaxy A71 फारसा गाजावाजा न करता भारतात सादर केला आहे.
Samsung Galaxy A71 मध्ये 6.7 इंची sAMOLED Plus Infinity-O डिस्प्ले दिलेला असून याचं रेजोल्यूशन Full HD+ आहे. फोनमध्ये Snapdragon 730 Octa Core प्रोसेसर असून हा फोन 8GB रॅम पर्यायात उपलब्ध होईल. स्टोरेज 128GB असेल जे MicroSD कार्ड द्वारे 512GB पर्यंत वाढवता येईल. 64MP + 12MP + 5MP + 5MP असे चार कॅमेरे असून फ्रंट कॅमेरा 32MP आहे

या फोनची किंमत भारतात २९९९९ इतकी असेल. हा फोन ऑफलाइन दुकाने, सॅमसंग इ शॉप, ऑनलाइन वेबसाइट्सवर २४ फेब्रुवारीपासून उपलब्ध होत आहे.

यासोबत सॅमसंगने Galaxy Buds Plus ची भारतीय किंमत सुद्धा जाहीर केली असून हे वायरलेस इयरबड्स ११९९० रुपयात मिळतील. हे बड्स Galaxy S20 मालिकेतील फोन्ससोबत सादर झाले होते. यांची प्रिऑर्डर आता सुरू झाली आहे. हे अवघ्या तीन मिनिटांच्या चार्जवर ६० मिनिटे चालू शकतील असं सॅमसंगने सांगितलं आहे!

Samsung Galaxy A71

डिस्प्ले : 6.7 इंची sAMOLED Plus Infinity-O
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 730
GPU : Adreno 618
रॅम : 8GB
स्टोरेज : 128GB + Expandable upto 512GB with MicroSD Card
कॅमेरा : 64MP + 12MP + 5MP + 5MP
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 4500mAh 25W charging power (5V, 2A inbox)
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10 Samsung One UI
इतर : Wi-Fi 802.11, ac/b/g/n/n 5GHz, Bluetooth 5.0, On-screen Fingerprint, Face recognition, Samsung Pay, Knox Security
सेन्सर्स : Light sensor, Proximity sensor, Accelerometer, Gyroscope
रंग : Prism Crush Black, Prism Crush Silver, Prism Crush Blue
किंमत : ₹२९९९९ (8GB)

Exit mobile version