मायक्रोसॉफ्टची करोना/COVID-19 साठी ट्रॅकिंग वेबसाइट! आता मराठीत!

काही दिवसांपूर्वी गूगलने जगभरातील करोना व्हायरस प्रसारासंदर्भात माहितीसाठी वेबसाइट आणत असल्याचं जाहीर केलं होतं मात्र त्याआधीच मायक्रोसॉफ्टने बिंगद्वारे याच उद्देशाने ट्रॅकिंग वेबसाइट सादर केली आहे. या वेबसाइटवर जगभरात कोणत्या देशात किती लोकांवर या व्हायरसचा परिणाम झाला आहे हे पाहायला मिळेल. वेबसाइटवर एकूण बाधा झालेले लोक, त्यातून बरे झालेले लोक आणि यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाहता येईल. यासोबत त्या त्या देशातील संबंधित माहिती, बातम्या, व्हिडिओसुद्धा जोडण्यात आले आहेत.

अपडेट : 27-04-2020 आजपासून ही वेबसाइट मराठीसह नऊ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. लिंक : bing.com/covid/local/india?setlang=mr

या वेबसाइटवरील माहितीनुसार भारतात आजवर एकूण १४७ जणांना याची व्हायरसची बाधा झाली आहे. सध्या १३० जणांवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. १४ जण उपचार घेऊन या व्हायरसपासून बरे होऊन घरी परतले आहेत आणि ३ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या वेबसाइटवरील माहिती World Health Organization (WHO), US Centers for Disease Control and Prevention (CDC) आणि European Centre for Disease Prevention and Control (ECDC) यांच्याकडून अधिकृतरित्या घेण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्ट बिंग COVID-19 Tracker : https://www.bing.com/covid

कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही उपाय

• गर्दीची ठिकाणे टाळा.
• चेहऱ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.
• सॅनिटायझर किंवा साबणाने हात अधूनमधून धुवा.
• शिंकताना/खोकताना तोंडासमोर रुमाल धरा.
• बाहेर पडताना मास्कचा वापर करा.

कोरोना व्हायरससंबंधित प्रमुख लक्षणे

• श्वास घेण्यात अडचण
• घसा तीव्र दुखणे/खवखव
• कोरडा खोकला
• ताप
• सर्दी/शिंका
• डोकेदुखी
• अशक्तपणा

वरील पैकी लक्षणे आढळल्यास लगेच आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयाकडे संपर्क साधा!
टोल फ्री हेल्पलाइन : 104
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष : 02026127394
राष्ट्रीय कॉल सेंटर : 01123978046

मराठीटेकतर्फे आवाहन
व्हॉट्सअॅपवर आलेल्या माहितीची खात्री केल्याशिवाय ती पुढे पाठवू नका. चुकीच्या माहितीमुळे/अफवांमुळे लोकांना/सरकारी संस्थांना विनाकारण त्रास होऊ शकतो.
वर दिलेल्या पर्यायांचा वापर करून काळजी घ्या. येणारे काही दिवस या व्हायरसच्या प्रसारास आळा घालण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत.

Exit mobile version