नोकीयाचे नवे स्मार्टफोन Nokia 8.3 5G, 5.3, 1.3 व 5310 सादर!

HMD Global मार्फत जोमाने सुरुवात केलेली मात्र गेले काही महीने जराशी निवांत झालेली नोकीया कंपनी आता पुन्हा नव्या तयारीने स्मार्टफोन बाजारात येताना दिसत आहे. काल त्यांनी चार नवे मॉडेल्स सादर केले असून यामध्ये एक 5G फोनसुद्धा आहे. सोबत Nokia 5310 हा एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेला फोन आता नव्या रूपात सादर झाला आहे. XpressMusic नावाच्या मालिकेत हा फोन खूप गाजला होता. खास संगीत शौकीनांसाठी यांमध्ये विशेष बटणे देण्यात आली होती. नोकीयाने आता तेच डिझाईन थोडाफार बदल करून नव्याने सादर केलं आहे!

नोकिया त्यांच्या प्रत्येक नव्या स्मार्टफोन लॉंचवेळी त्यांच्या पूर्वीच्या गाजलेल्या फीचर फोनची नवी आवृत्ती सादर करत असल्याचं दिसून येत आहे. नवे फोन्स लोकांना देखील जुन्या आठवणी जाग्या करणाऱ्या असल्यामुळे आवडलेले दिसत आहेत. नव्या नोकिया 5310 मध्ये Dual front-facing speakers असून EUR 39 (~३२००)

नोकियाचा पहिला 5G फोन Nokia 8.3 5G सादर करण्यात आला असून यामध्ये चार कॅमेरा सेटप आहे. 64MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाइड अॅंगल, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. यासाठी नवं गोलाकार डिझाईन पहायला मिळेल. 24MP फ्रंट कॅमेरा असेल. याचा फिंगरप्रिंट स्कॅनर उजव्या बाजूला आहे. यामध्ये 4500mAh बॅटरी देण्यात आली आणि सोबत 18W फास्ट चार्जिंगसुद्धा आहे. याचा डिस्प्ले 6.81-inch Full HD+ 120Hz आहे! Snapdragon 765G प्रोसेसरचा यामध्ये समावेश आहे. याची किंमत EUR 599 (~४९०००) अर्थात भारतात उपलब्ध होताना ही किंमत वेगळी असेल.

Nokia 5.3 हा मध्यम किंमतीचा फोन सादर करण्यात आला असून यामध्येही चार कॅमेरा सेटप आहे. 13MP मुख्य कॅमेरा, 5MP अल्ट्रा वाइड अॅंगल, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. यासाठी नवं गोलाकार डिझाईन पहायला मिळेल. 8MP फ्रंट कॅमेरा असेल. याचा फिंगरप्रिंट स्कॅनर मागच्या बाजूला आहे. यामध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आणि सोबत 10W फास्ट चार्जिंगसुद्धा आहे. याचा डिस्प्ले 6.55-inch HD+ आहे! Snapdragon 665 प्रोसेसरचा यामध्ये समावेश आहे. याची किंमत EUR 189 (~१५५००) अर्थात भारतात उपलब्ध होताना ही किंमत वेगळी असेल.

Nokia 1.3 हा कमी किंमतीचा फोन सादर करण्यात आला असून 8MP मुख्य कॅमेरा मिळेल. सिंगल कॅमेरा सेटप असून 5MP फ्रंट कॅमेरा असेल. याचा फिंगरप्रिंट स्कॅनर मागच्या बाजूला आहे. यामध्ये 3000mAh बॅटरी देण्यात आली आणि सोबत 5W चार्जिंग आहे. यामध्ये Android 10 (Go Edition) ऑपरेटिंग सिस्टम आहे. याचा डिस्प्ले 5.7-inch HD+आहे! Snapdragon 215 प्रोसेसरचा यामध्ये समावेश आहे. याची किंमत EUR 95 (~७८००) अर्थात भारतात उपलब्ध होताना ही किंमत वेगळी असेल.

Search Terms : Nokia 5310 XpressMusic is back, Nokia launched its first 5G phone as Nokia 8.3 5g alongwith Nokia 5.3 and Nokia 1.3

Exit mobile version