सॅमसंग Galaxy M21 भारतात सादर : सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन!

सॅमसंगने त्यांच्या M स्मार्टफोन मालिकेत M21 या आणखी एका नव्या स्वस्त स्मार्टफोनची भर घातली असून हा नवा फोन काही दिवसांपूर्वीच आलेल्या M31 ची स्वस्त आवृत्ती असेल. नवा फोनची किंमत १२९९९ पासून सुरू होते. हा फोन खरेतर १६ मार्चला भारतात सादर केला जाणार होता मात्र करोना व्हायरसमुळे तो कार्यक्रम रद्द करून १८ मार्चला घेण्यात आला आहे. या फोनच्या विशेष गोष्टी म्हणजे मोठी 6000mAh फास्ट चार्ज बॅटरी, sAMOLED डिस्प्ले, ट्रिपल कॅमेरा सेटप! हा फोन २३ मार्चपासून अॅमेझॉन, सॅमसंग ऑफलाइन व ऑनलाइन स्टोर्समध्ये मिळायला सुरुवात होईल.

M21 मध्ये 6.4″ Infinity U डिस्प्ले आहे. यामध्ये Samsung चा Exynos 9611 प्रोसेसर असून 4GB व 6GB रॅमचे पर्याय उपलब्ध आहेत. मुख्य कॅमेरा 48MP असून 8MP अल्ट्रा वाईड आणि 5MP डेप्थ कॅमेरा मिळेल. बॅटरी 6000mAh ची असून M मालिकेतील इतर फोन्स प्रमाणेच याचा बॅटरी बॅकअप सर्वाधिक आहे! सोबत 15W फास्ट चार्जिंगसुद्धा देण्यात आलं आहे.

गेल्या काही महिन्यांत आलेल्या M30s, M31, M21 या मॉडेल्समध्ये फारसा फरत नसल्याचं आता ग्राहक बोलून दाखवत आहेत यावर काही कृती न केल्यास सॅमसंगला आजवरच्या M सिरीज फोन्सद्वारे मिळालेलं यश नंतर मिळणार नाही हे नक्की…

Samsung Galaxy M21

डिस्प्ले : 6.4″ SuperAMOLED Infinity-U Display
प्रोसेसर : Samsung Exynos 9611 processor
GPU : Mali G72
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 64GB/128GB + Expandable upto 512GB
कॅमेरा : 48MP Triple Camera + 8MP Ultrawide + 5MP Depth
फ्रंट कॅमेरा : 20MP
बॅटरी : 6000mAh 15W Fast Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac Bluetooth 5.0, Fingerprint Scanner
नेटवर्क : 4G Dual VoLTE
सेन्सर्स : Light sensor, Proximity sensor, GeoMagnetic sensor, Gyro-meter, Accelerometer sensor
रंग : Midnight Blue, Raven Black
किंमत : हा फोन २३ मार्चपासून उपलब्ध होत आहे.
4GB+64GB ₹ १२९९९
6GB+128GB

Exit mobile version