DJI Mavic Air 2 ड्रोन सादर : आता सुधारित 4K 60p कॅमेरा आणि बॅटरी लाईफसह!

DJI या ड्रोन निर्मितीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कंपनीने त्यांचा नवा ड्रोन सादर केला असून हा स्वस्त ड्रोन मालिका असलेला Mavic Air ची नवी आवृत्ती असेल.  Mavic Air 2 मध्ये बऱ्याच नव्या सुविधा जोडण्यात आल्या असून आधीच्या ड्रोनपेक्षा हा अनेक पटींनी सुधारित आहे असं म्हणावं लागेल. नव्या डीजेआय ड्रोनचा फ्लाइट टाइम ३४ मिनिटे असून याबाबत या ड्रोनने त्यांच्या मोठ्या ड्रोन्सलासुद्धा मागे टाकलं आहे! यासाठी यामध्ये नवे स्पीड कंट्रोलर्स आणि नवी बॅटरी वापरण्यात आली आहे. नवा ड्रोन कॅमेरा आता 48MP फोटो काढू शकेल आणि 4K 60p रेजोल्यूशन व्हिडिओ रेकॉर्ड करू शकेल!

Mavic Air 2 मध्ये नवा 1/2″ Quad Bayer सेन्सर देण्यात आला आहे जो 12MP फोटो काढू शकेल. जाहिरातीमध्ये 48MP फोटो मोडचा उल्लेख आहे मात्र हा पूर्ण फोटो 48MP असेल की फक्त 12MP चे चार फोटो जोडून त्याचा 48MP फोटो केला जात आहे हे स्पष्ट नाही. यासोबत 8K timelapse चीही सोय देण्यात आली आहे! 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी HDR म्हणजेच हाय डायनॅमिक रेंज उपलब्ध असेल. ट्रॅकिंग करत व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी फोकस ट्रॅकिंग देण्यात आलं आहेच.  दोन ND Filters सुद्धा स्वतंत्र खरेदी करता येतील ज्यामुळे exposure वर नियंत्रण मिळवता येईल.

नव्या ड्रोनची बॅटरी लाईफ अनेकांना या ड्रोनकडे आकर्षित करेल कारण ३४ मिनिटे फ्लाइट टाइम सध्याच्या ड्रोन्सच्या मानाने खूप आहे. यासाठी 3,500mAh बॅटरीचा समावेश केलेला आहे. यासोबत ड्रोनचा कंट्रोलरसुद्धा बऱ्यापैकी बदलण्यात आला असून मोठ्या फोन्सना माऊंट करणं सहज करून देण्यात आलं आहे. नवं डिझाईन नक्कीच आधीपेक्षा चांगलं वाटत आहे. हा ड्रोन बाजारात आता सर्वात उत्तम ड्रोन पर्यायांपैकी एक नक्कीच बनला आहे. सध्या हा ड्रोन फक्त चीनमध्ये उपलब्ध असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत जाईल तसा इतर देशात उपलब्ध होईल.

DJI Mavic Air 2 ड्रोनची खास वैशिष्ट्ये :

Search Terms : New DJI Mavic Air 2 with better camera with 4K 60 p recording and longer battery life of upto 34 minutes of flight time!

Exit mobile version