Vivo V19 भारतात सादर : SD712 प्रोसेसर आणि 4500mAh बॅटरी

विवो या चीनी कंपनीने गेल्या महिन्यात इतरत्र सादर झालेला Vivo V19 हा फोन आज भारतात उपलब्ध करून दिला असून त्यांच्या V17 या फोनची पुढची आवृत्ती म्हणता येईल. यामध्ये Qualcomm Snapdragon 712 प्रोसेसर, 6.44-inch E3 super-AMOLED डिस्प्ले, 4500mAh बॅटरी यासोबत 33W Flash Charge देण्यात आलं आहे. 0 ते 70% चार्जिंग 40 मिनिटात होईल असं विवोने सांगितलं आहे. इतर कंपन्या 5G फोन्स आणत असताना विवोने एव्हढया किंमतीत 4G फोन आणला आहे. 48MP+8MP+2MP+2MP असे कॅमेरे देण्यात आले आहेत. सेल्फीसाठी पुढे दोन कॅमेरे असून एक 32MP आणि दुसरा 8MP आहे! या फोनची किंमत २७९९० (8GB+128GB) आणि ३१९९० (8GB+256GB) अशी आहे.

Vivo V19

डिस्प्ले : 6.44″ Super AMOLED Display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 712
GPU : Adreno 616
रॅम : 8GB
स्टोरेज : 128GB/256GB
कॅमेरा : 48MP Quad Camera + 8MP Ultrawide + 2MP Portrait lens + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 32MP+8MP
बॅटरी : 4500mAh 33W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : Funtouch OS 10 (based on Android 10)
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5, WiFi, In Display Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot, Dolby Atmos
सेन्सर्स :Accelerometer, Ambient light sensor, Proximity Sensor, E-compass, gyroscope
रंग : Sleek Silver, Gleam Black
किंमत : हा फोन १५ मे पासून उपलब्ध होत आहे.
8GB+128GB ₹27990
8GB+256GB ₹31990

सध्या भारतात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चीनी फोन्स आणि कंपन्याविरोधातील मोहीम पाहता या फोन्सची मागणी काही प्रमाणात कमी होऊ शकते. भारतीय स्मार्टफोन कंपन्या जवळपास नाहीशा झाल्या असल्या तरी सॅमसंग सारख्या चीनी नसलेल्या कंपनीला प्राधान्य द्यावं असं या मतप्रवाहात सांगण्यात येत आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच फोन्सवरील नवीन GST लागू झाल्यामुळे आधीच फोन्सच्या किंमती वाढल्या आहेत… यामुळे एकतर किंमत वाढवा किंवा आहे त्या किंमतीत कमी सुविधा द्या असा पर्याय चीनी कंपन्याना निवडावा लागेल…विवोच्या या फोनमधील सुविधा लक्षात घेता यासाठी इतर बरेच चांगले पर्याय उपलब्ध असल्याचं दिसतं. उदा. Samsung Galaxy A71

Exit mobile version