विंडोज १० चं नवं अपडेट आता उपलब्ध : Windows 10 May 2020 Update

विंडोज १० या प्रसिद्ध डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टमचं नवं अपडेट जे या ओएसमध्ये अनेक सोयी जोडत आहे हे आता उपलब्ध झालं असून याचं नाव Windows 10 May 2020 Update असं आहे. विंडोज ओएससाठी मायक्रोसॉफ्टने विंडोज १० नंतर नवी आवृत्ती आणणार नसल्याचं जाहीर केलं होतं. यापुढे केवळ विंडोज १० लाच अपडेट्सद्वारे नव्या सुविधा जोडल्या जात आहेत. या अंतर्गत ठराविक महिन्यांनी एक मोठं अपडेट दिलं जातं त्यापैकी हे मे २०२० अपडेट आता डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. याचं व्हर्जन Windows 10 Version 2004 असं असणार आहे.

नव्या विंडोजमध्ये वेगवान कनेक्शन्स, डेस्कटॉपला नावे देणे, अधिक Kaomoji चा समावेश, एज ब्राऊजरमध्ये आता रॅमचा कमी वापर, नोटपॅडमध्ये अनेक वर्षांनी नव्या सोयी, कोर्टाना हा व्हॉईस असिस्टंट आता ओएस ऐवजी सिस्टम अॅप म्हणून उपलब्ध होणार असून आता चॅट प्रमाणे काम करेल म्हणजे बोलण्याऐवजी टाइप करून सुद्धा मदत मिळवू शकाल!

हे अपडेट डाउनलोड करण्यासाठी Settings > Update & Security > Windows Update आणि मग Check for updates.
अधिक माहिती : https://bit.ly/2ZK7rSk
नव्याने विंडोज १० इंस्टॉल करण्यासाठी आमचा व्हिडिओ पाहू शकता : https://youtu.be/cYjixgDtTiU

Windows 10 May 2020 Update मधील नव्या सुविधा!

Search Terms : What’s new in the Windows 10 May 2020 Update How to get the Windows 10 May 2020 Update

Exit mobile version